Goa Paddy Farming: पावसाने आणखी दडी मारली तर भातशेती धोक्यात; कणसे धरण्याच्या काळात कृषी संचालकांचा इशारा

Goa Paddy Farming Rainfall Shortage: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. सध्या भाताला कणसे धरण्याचा काळ आहे.
Goa Paddy Farming Rainfall Shortage
Goa Paddy FarmingDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. सध्या भाताला कणसे धरण्याचा काळ आहे. या टप्प्यावर भातशेतीला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज नसली तरी पाऊस लांबल्यास काही भागांतील शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्यातील कृषी परिस्थितीचा दररोज आढावा घेत असून, परिस्थितीनुसार योग्य निर्णय व मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील, अशी माहिती कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली.

पुरेसा पाऊस न झाल्यास कमी पाण्याचे स्रोत असलेल्या मरड भागातील भातशेतीला अधिक धोका निर्माण होऊ शकतो. कणसे फुटण्याच्या काळात भाताला पुरेसे पाणी न मिळाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसातून किमान एकदा हलकी सर पडणे आवश्यक आहे. पुढील काही दिवस पावसाची अशीच उघडीप राहिल्यास भातशेतीवर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता देसाई यांनी व्यक्त केली.

Goa Paddy Farming Rainfall Shortage
Goa Rakhonn Yatra: 'कळंगुटच्या राखण यात्रेसाठी केपेतील लोकांना पैसे देऊन आणले'; मायकल लोबो यांचा काँग्रेसवर घणाघात

जलस्रोतांचा वापर करा

राज्यात सुमारे ३१ टक्के पावसाची तूट कायम आहे. धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असला तरी आगामी काळासाठी पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक आहे. पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांनी तलाव, विहिरी आणि अन्य उपलब्ध जलस्रोतांचा वापर करून भातशेतीला पुरेसे पाणी द्यावे व पिकाची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी

शेजारील कर्नाटक व महाराष्ट्रात पावसाच्या तुटवड्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. कर्नाटकात शेतकऱ्यांना आर्थिक मदत, तर महाराष्ट्रात कर्जमाफीसह विविध निर्णय घेण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर गोव्यातही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Goa Paddy Farming Rainfall Shortage
Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com