Goa Rakhonn Yatra: 'कळंगुटच्या राखण यात्रेसाठी केपेतील लोकांना पैसे देऊन आणले'; मायकल लोबो यांचा काँग्रेसवर घणाघात

Goa Rakhonn Yatra: येत्‍या विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर, प्रदेश काँग्रेसने राज्‍यभर गोवा राखण यात्रा सुरू केलेली आहे.
Goa Rakhonn Yatra
Goa Rakhonn YatraDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: ‘‘काँग्रेसला कळंगुटमधील राखण यात्रेसाठी स्‍थानिक काँग्रेस नेते, कार्यकर्ते मिळाले नाहीत. त्‍यामुळे प्रत्‍येकी दीड हजार रुपये देऊन केपेतील लोकांना कळंगुटमध्‍ये आणावे लागले’’, असा दावा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला.

येत्‍या विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर, प्रदेश काँग्रेसने राज्‍यभर गोवा राखण यात्रा सुरू केलेली आहे. परंतु, या यात्रेत इतर राज्‍यांतील काँग्रेस कार्यकर्त्यांचा भरणा अधिक आणि स्‍थानिकांचा सहभाग कमी असल्‍याने यात्रेची भाजप नेत्‍यांकडून खिल्ली उडवली जात आहे. ही यात्रा रविवारी कळंगुटमध्‍ये झाली.

Goa Rakhonn Yatra
Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

यासंदर्भात पत्रकारांनी सोमवारी आमदार मायकल लोबो यांच्‍याशी संवाद साधला असता, ‘‘कळंगुटमधील यात्रेला काँग्रेसला स्‍थानिक नेते मिळाले नाहीत. त्‍यामुळे प्रत्‍येकी दीड हजार रुपये देऊन केपेतून नागरिकांना आणावे लागले. यात्रेत केपेतील चार बसेसमधून आलेले सुमारे १४० जण सहभागी झाले होते’’, असे ते म्‍हणाले.

कळंगुटमधील जनतेचा माझ्‍यावर विश्‍‍वास!

‘‘निवडणुकीच्‍या तोंडावर कळंगुटमधील जे नेते काँग्रेसमध्‍ये गेले आहेत, ते मुळचे भाजपचे आहेत. त्‍यांना काम नको, सत्ता हवी आहे. त्‍यामुळे कळंगुटमधील विकासकामांनाही त्‍यांच्‍याकडून विरोध होत आहे. आपल्‍याला जनतेची कामे झालेली हवी आहेत.

Goa Rakhonn Yatra
Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

आमदार या नात्‍याने आपण त्‍यासाठी प्रयत्‍नरत असतो. याची कळंगुटमधील जनतेला जाणीव आहे. त्‍यामुळे तेथे आपल्‍याविरोधात कितीहीजण एकत्र आले, तरी आपल्‍याला भीती बाळगण्‍याची गरज नाही. कळंगुटमधील जनतेचा माझ्‍यावर पूर्ण विश्‍‍वास आहे’’, असे लोबो यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

MLA Protection Yatra
Goa Rakshan Yatra
Goa Rakshan Yatra 2026
Michael Lobo Bardez Development
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com