Goa Tiger Deaths Dainik Gomantak
गोवा

Goa Tiger Deaths: सावध व्हा! म्हादईच्या जंगलात वाघांच्या रक्ताचा सडा, गोळावलीतील 'ते' हत्याकांड पुन्हा चर्चेत; एकाच वेळी नर, वाघीण आणि दोन बछड्यांचा क्रूर बळी

Mhadei Wildlife Sanctuary Tiger Deaths: सत्तरी तालुक्यातील गोळावली गावात २०२० साली घडलेली पट्टेरी वाघाच्या मृत्यूची घटना ही राज्याच्या वन्यजीव इतिहासातील अत्यंत धक्कादायक घटना मानली जाते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वाळपई: सत्तरी तालुक्यातील गोळावली गावात २०२० साली घडलेली पट्टेरी वाघाच्या मृत्यूची घटना ही राज्याच्या वन्यजीव इतिहासातील अत्यंत धक्कादायक घटना मानली जाते. भुगत उत्सवाच्या तयारीसाठी गावकरी जंगलात गेले असता त्यांना कुजलेल्या अवस्थेत नर वाघाचा मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि तत्काळ वन खात्याला याची माहिती देण्यात आली.

घटनेनंतर सुरू झालेल्या तपासात आणखी गंभीर बाबी समोर आल्या. त्याच परिसरात एकूण चार वाघांचे मृतदेह किंवा अवशेष सापडले. यामध्ये एक प्रौढ वाघीण आणि दोन बछड्यांचा समावेश होता. काही मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत उघड्यावर पडलेले होते, तर काही अवशेष जमिनीत पुरलेले आढळले. तपासातून विषप्रयोगामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या सर्व घटनांमुळे ही नैसर्गिक मृत्यूची बाब नसून नियोजनपूर्वक करण्यात आलेली हत्या असल्याचे स्पष्ट झाले.

म्हादई अभयारण्य हा परिसर जैवविविधतेने समृद्ध असून येथे वाघांचे अस्तित्व पूर्वीपासून अधोरेखित झाले आहे. २०१३ साली प्रथमच कॅमेरा ट्रॅपमध्ये पट्टेरी वाघाचे छायाचित्र टिपण्यात आले होते. त्यानंतर २०१५, २०१६ आणि २०१७ या काळातही विविध ठिकाणी वाघांचे अस्तित्व नोंदवले गेले. विशेषतः २०१७ साली साट्रे परिसरात पाच वाघांचे अस्तित्व दिसून आले होते. वाघांचे पायांचे ठसे, मलमूत्र नमुने तपासासाठी डेहराडून येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते, ज्यातून सत्तरी तालुका हा वाघांच्या भ्रमंतीचा महत्त्वाचा पट्टा असल्याचे स्पष्ट झाले.

या आधी २००९ साली केरी येथे घडलेले वाघ हत्या प्रकरणही तितकेच गाजले होते. रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात वाघ अडकला आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात काही संशयितांना अटक करण्यात आली होती. मात्र, पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. या घटनेत तपासातील त्रुटी आणि पुरावे नष्ट होणे हे गंभीर मुद्दे ठरले होते. 2019 ते 2025 या काळात राज्यात पाच वाघ मोरले गेले. साकोर्डाची ही सहावी घटना ठरली.

दरम्यान, सत्तरी तालुक्यात व्याघ्र प्रकल्प राबवण्याबाबतही चर्चा रंगली होती. केंद्रीय समितीने लोकवस्तीचा विचार करून सुमारे ६१२ कुटुंबांच्या वास्तव्यामुळे पहिल्या टप्प्यात हा भाग व्याघ्र क्षेत्र म्हणून घोषित न करण्याची शिफारस केली होती. पुढील टप्प्यात जनजागृती, पुनर्वसन आणि स्थानिकांच्या मंजुरीनंतरच निर्णय घेण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे सध्या व्याघ्र प्रकल्पाचा निर्णय लांबणीवर गेला असला तरी वाघांचे अस्तित्व अधोरेखित झाल्याने भविष्यातील धोरणांबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

म्हादईतील वाघ हत्येच्या या घटनांनी राज्याच्या वन्यजीव सुरक्षेतील उणिवा स्पष्ट केल्या असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे

नियमित गस्त, कठोर उपाययोजना हवी!

गोळावलीतील या घटनेने केवळ वन्यजीव संरक्षणाचीच नव्हे तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेचीही परीक्षा घेतली होती. स्थानिकांच्या मते, जंगल परिसरात बेकायदेशीर शिकारीचे प्रकार अद्यापही सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना, नियमित गस्त आणि तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे.

आजही सत्तरी तालुक्यात वाघांच्या वावराच्या चर्चा सुरू असतात. जंगल परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि कुतूहल यांचे मिश्र वातावरण आहे. एकीकडे वन्यजीवांचे संरक्षण करणे आवश्यक असताना दुसरीकडे स्थानिकांच्या सुरक्षेची हमी देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे वन खात्याने स्थानिकांसोबत समन्वय साधत शाश्वत उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT