Mhadei Wildlife Dainik Gomantak
गोवा

Mhadei Wildlife: देवराईचं जंगल, पाण्याचे झरे आणि हजारो वर्षांचा वारसा 'म्हादईची देवराई', निसर्गसंपन्नतेचं देवतांकडून दिलेलं देणं

Mhadei Wildlife Sanctuary: म्हादई अभयारण्यातील ‘निसर्गसंपन्न देवराई’ हे देवतांचे अनोखे देणे आहे. त्याचा अभ्यास करून हा म्हादईच्या ‘सुजलाम सुफलाम’ अशा परिसराचे जतन, संवर्धन करणे काळाची गरज आहे.

Sameer Amunekar

Devrai forest Goa

म्हादई अभयारण्यातील ‘निसर्गसंपन्न देवराई’ हे देवतांचे अनोखे देणे आहे. त्याचा अभ्यास करून हा म्हादईच्या ‘सुजलाम सुफलाम’ अशा परिसराचे जतन, संवर्धन करणे काळाची गरज आहे. या क्षेत्राचा अनुभव सर्वांनी घेतला पाहिजे पण शालेय विद्यार्थ्यांनी तर त्याचा अवश्य अभ्यास केला पाहिजे.

‘म्हादई वाईल्ड लाईफ सॅंच्युरी’त भ्रमंती केल्यास निसर्ग सौंदर्याचा प्रत्यय येतोच पण आपल्या पूर्वजांनी जंगलांना कोणतीही इजा होऊ नये, याची खबरदारी घेत जंगलांचे रक्षण कशाप्रकारे केले आहे हे जाणून त्याचे कौतुकही मनात तरळत राहते.

आपल्या पूर्वजांनी जतन करून ठेवलेले जंगलाचे वैभव- देवराई तर तिथली अद्भुत गोष्ट आहे. म्हादई अभयारण्य, जंगल, पर्यावरण, वन्यसंपत्ती, प्राणी, पशू, पक्षी, उंच देवराई हा सारा खजिना आहे. जंगलाबद्दल असलेली आत्मियता वाढवण्यासाठी, विशेषत: शालेय मुलांसाठी, या खजिन्याची माहिती देणारे उपक्रम राबवणे आवश्यक आहे.

माळोली गावात असलेली देवराई तर वैशिष्ट्यपूर्ण आहे. या तिथली ‘यू’ आकाराची वनस्पती देवराईचे वेगळेपण सांगून जाते. याठिकाणी एकपेशीय वनस्पती बुरशीचे अधिष्ष्ठान कायमचे आहे.

डोळ्यांना दिसणारी एकपेशीय वनस्पती बुरशी (sighted Algae Fungus) , तो जंगल भाग आरोग्यदायी असून त्या जंगली भागात प्रदूषण नसल्याचा संकेत दर्शविते. पाणथळ क्षेत्रात ही वनस्पती आढळून येते.

निरंकाराची राय’ हा भाग पाण्याच्या स्रोताने बहरलेला आहे. ब्रम्हाकरमळी गावातही देवराई आहे. या भागातून आवाज करीत वाहणारे पाण्याचे झरे आल्हादायक आहेत. उस्ते गावातून किंवा करंझोळ- बंदीरवाडा गावातून जाताना झाडानी नावाच्या परिसरात असलेली उंच झाडे त्यांच्या शेकडो वर्षांच्या अस्तित्वाची प्रचिती देतात.

पावसाळा सोडल्यास हिवाळी, उन्हाळी हंगामात या भागात वनखात्याच्या रितसर परवानगीने फिरल्यास जंगलातील अनेक गोष्टींचा अभ्यास करता येतो. तिथल्या देवराईच्या परिसरात थंडगार पाणी घेऊन वाहणारे, उंच कपारीवरून वाहणारे काही धबधबेही निसर्ग समृद्धतेची अनुभूती देऊन जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Smuggling: कालेत खैरीच्‍या झाडांची तस्‍करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; तिघांना अटक

Vasco: मासेमारी सुरू होऊनही खारीवाडा जेटीवर सामसूम, 75 टक्के ट्रॉलर्स उभेच; परप्रांतीय कामगारांची प्रतीक्षा

Goa Live Updates: कुंडईत छतावरून पडून कामगाराचा मृत्यू

Old Goa: 'मास्टर प्लॅन'ची त्‍वरित अंमलबजावणी करा, 'सेव्ह ओल्ड-गोवा' कृती समितीची सरकारकडे मागणी

Quepem: केपे गणेशोत्‍सवाची लॉटरी ठरली 'हिट', काही तासांतच 1.5 लाख तिकिटांची विक्री

SCROLL FOR NEXT