Goa Court: चॉकलेटमधून गुंगीचे औषध घालून मुलीच्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Goa Pocso Court Judgement: दक्षिण गोव्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना ऑक्टोबर २०२३ मध्ये उघडकीस आली होती.
Goa Pocso Court
Goa Pocso CourtDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आपल्याच मुलीच्या १७ वर्षीय अल्पवयीन मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पणजीतील पॉक्सो न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. चॉकलेटमध्ये गुंगीचे औषध घालून २०२३ मध्ये आरोपीने अत्याचार केला होता.

दक्षिण गोव्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना ऑक्टोबर २०२३ मध्ये उघडकीस आली होती. याप्रकरणी वास्को पोलिसांनी संशयिताला भारतीय दंड संहिता कलम ३७६, पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करुन अटक केली होती. डिसेंबरमध्ये पोलिसांनी त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. पीडित मुलीने साक्ष दिल्यानंतर आरोपीला दोषी ठरवून त्याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Goa Pocso Court
Mapusa: म्हापसा बाजारपेठेतील मार्केटच्या छताची दुरवस्था! काँक्रिट उखडले, तत्काळ दुरुस्तीची गरज

आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास आणि दोन लाख ७५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दंड न भरल्यास तीन महिन्यांचा सश्रम कैद अधिक भोगावी लागेल. तसेच, दंडाची रक्कम जमा केल्यास ती पीडितेला द्यावी, अशे आदेश न्यायमूर्ती दुर्गा मडकईकर यांनी दिले आहेत.

Goa Pocso Court
Sonu Nigam Tweet: 'आरसीबी जिंकल्यापासून काहीच चांगलं घडत नाहीये' सोनू निगमच्या ट्विटने सोशल मीडियावर वादळ

पीडित मुलगी आरोपीच्या घराच्या शेजारी राहत होता. आरोपीची मुलगी आणि पीडित मुलगी मैत्रिणी होत्या. आरोपीने चॉकलेटमध्ये गुंगीचे औषध घालून मुलीला दिले व लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीच्या कुंटुंबीयांनी याप्रकरणी वास्को पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपीला अटक करत चौकशी पूर्ण करुन त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com