Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: 'मानवी साखळी’साठी म्हादई प्रेमी एकवटले

राज्यातील विविध एनजीओ तसेच सांस्कृतिक संघटनांनीदेखील या मानवी साखळीला पाठिंबा दर्शविला

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute 'आम्ही सर्व गोमंतकीय म्हादईच्या संरक्षणासाठी एकत्र आहोत' हे ब्रीद वाक्य सार्थ ठरवण्यासाठी 'सेव्ह म्हादई सेव्ह गोवा फ्रंट'तर्फे आज पणजीत संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत शहरातील विविध भागांत ‘मानवी साखळी’चे आयोजन करण्यात आले होते.

म्हादईची निरंतरता कायम रहावी, यासाठी राज्यातील कलाकार मंडळी शनिवारी जागृतीसाठी मानवी साखळीच्या रूपाने आंदोलनात सहभागी झाली.

मिरामार येथे दुपारी तीन वाजल्यापासून मानवी साखळीसाठी लोकांनी एकत्र जमायला सुरुवात केली. करंझाळे ते जुन्या सचिवालयापर्यंतच्या मांडवी जेटीपर्यंत मानवी साखळी निर्माण करीत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

सायंकाळी प्रख्यात गायिका हेमा सरदेसाई यांनी म्हादईवरील गीत गात वातावरण निर्मिती केली.

राज्यातील विविध एनजीओ तसेच सांस्कृतिक संघटनांनीदेखील या मानवी साखळीला पाठिंबा दर्शविला.

विरोधी पक्षनेता युरी आलेमाव, केपे आमदार अल्टोन डिकॉस्टा, अमरनाथअल्डोना, सरचिटणीस एव्हरसन वेल्स, महिला काँग्रेस अध्यक्षा बीना नाईक यांनी म्हादईसाठीच्या "मानवी साखळी" मध्ये सहभाग घेतला.

तसेच गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई कार्यकर्त्यांसह मिरामार येथे म्हादईसाठी मानवी साखळीत सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Barch Club Fire Accident: 'बर्च' क्लब आग दुर्घटना अपघाती? लुथरा बंधूंच्या जामिनावर बचाव पक्षाचा युक्तिवाद

Ranji Trophy: 'रणजी'त होणार दिग्गजांची धमाकेदार एंट्री! शुभमन गिल, बुमराह आणि राहुल खेळणार देशांतर्गत क्रिकेट; BCCIचा मास्टरस्ट्रोक

Griha Aadhar Scheme: 'गृहआधार'च्या रकमेत वाढ; दिवाळीत CM सावंत करणार मोठी घोषणा

RGP Membership: फक्त 5 रुपयांत 'आरजी'चे सदस्यत्व; वीरेश बोरकरांकडून निधी संकलनाची मोहीम सुरू

Shani Vakri Upay 2026: वक्री शनि वाढवणार 'या' 5 राशींच्या जातकांची डोकेदुखी, नशिबात मोठा संघर्ष; ताबडतोब करा हे उपाय

SCROLL FOR NEXT