Sudin Dhavalikar Dainik Gomantak 
गोवा

गोव्याच्या भवितव्यासाठी मगो हाच पर्याय

17 वर्ष कॉंग्रेसने आणि 12 वर्षे सत्ता स्थापन केलेल्या भाजपाने गोव्याला विनाशाकडे नेण्याचे काम केले; सुदिन ढवळीकर

दैनिक गोमन्तक

गोव्याच्या राजकीय इतिहासात म.गो. पक्षाचा सत्ताकाळ हा सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर राज्यात दोन राष्ट्रीय पक्ष आणि एका स्थानिक पक्षाने जास्त काळ सत्ता स्थापन केली कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचा सत्ताकाळ हा गोव्याच्या नावाला बट्टा लावणारा ठरला तर मगो पक्षाचा सत्ताकाळ हा गोव्याच्या विकासाची दिशा दाखवणारा, गोव्याचे भवितव्य घडवणारा आणि सुजलाम् सुफलाम् गोवा घडवणारा ठरला. अस मत मगोचे ज्येष्ठ व विरोधी पक्षनेते सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी मांडले.

स्वातंत्र्यानंतर मगो पक्षाचे पहिले सरकार आणि युगपुरुष भाऊसाहेब बांदोडकर यांच्यासारखे दुरदृष्टीचे नेते गोव्याला लाभले आणि त्यामुळेच गोव्याचा विकास होऊ शकला. शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवून मानवी विकासाचा खरा पाया भाऊसाहेबांनी घातला आणि इथूनच गोव्याच्या सुखद भवितव्याचा मार्ग खुला झाला. म.गो. पक्षाचा 17 वर्षांचा सत्ताकाळ हा गोव्यासाठी आणि गोमंतकीयांसाठी सुवर्णकाळ होता. मात्र त्यानंतर 17 वर्षे गोव्यावर राज्य केलेल्या कॉंग्रेस पक्षाने आणि 12 वर्षे सत्ता स्थापन केलेल्या भाजपाने गोव्याला विनाशाकडे नेण्याचे काम केले. आज गोव्याची झालेली बिकट अवस्था, समस्याधीन गोंयकार तसेच कंगाल स्थिती आणि भविष्याचे भयाण संकट याला सर्वस्वी भाजपा आणि कॉंग्रेस पक्ष जबाबदार आहेत.

म्हणून गोव्याच्या सुजाण नागरिकांनी व नव्या पिढीने गोवा सावरण्यासाठी आणि पुन्हा सुंदर, सुरक्षित आणि उज्वल भवितव्याचा गोवा घडविण्यासाठी म.गो. पक्षाला पाठिंबा देणे नितांत गरजेचे आहे. गोव्याच्या भवितव्यासाठी आणि सक्षम व मजबूत गोवा घडवण्यासाठी 14 फेब्रूवारीला मगो पक्षाला कौल द्यावी हीच विनंती.

मगो पक्षाचे पहिले सरकार गोव्यात स्थापन झाले व भाऊ साहेब बांदोडकर स्वतंत्र गोव्याचे पहिले मुख्यमंत्री बनले. एक दिव्य दृष्टीचे सरकार सत्तेवरती आले. 1963 साली स्थापन झाले भाऊ साहेबांचे पहिले सरकार हे गोमंतकीयांसाठी अभिमानाचे, गर्वाने मान ताठ करणारे ठरले. या काळात म. गो. पक्षाने गोव्याच्या विकासावर भर दिला. प्रचंड गरीबी आणि निरक्षरता यामुळे मानवी विकासाला चालना देणे खुप कठीण होते. त्यासाठी भाऊसाहेबांनी अगोदर साक्षरतेला प्राधान्य दिले. मुले शाळेपर्यंत पोहचणे कठीण आहे हे लक्षात घेऊन शाळा मुलांच्या दारी आणण्याचे काम भाऊसाहेबांनी केले. शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली. आणि शिक्षित गोवा घडवण्यावर भर दिला.

विकास आणि अर्थव्यवस्था या दोन्ही गोष्टींची सांगड घातली. 1963 ते 1972 या कालावधीत गोव्यात खाण व्यवसायाच्या रूपाने अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम केले. पण 500 पेक्षाही जास्त खाण लिजे असूनही खाण व्यवसाय चांगल्या पध्दतीने चालला. या उलट भाजप व कॉग्रेसच्या सत्‍ताकाळात केवळ 80 खाण लिजे राहिली पण प्रचंड मोठी लूट व बेधूंद कारभार या कालावधीत झाला.

भाजप व कॉंग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांच्या सरकारांनी खाण व्यवसायाच्या माध्यमातून प्रचंड मोठी लूट केली. भाजप मुख्यमंत्री खाण व्यावसायिक बनले. तर कॉग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर असताना 2007 ते 2012 या कालावधीत खाण व्यवसाय बेफाम बनला 25 हजार कोटींची लूट या कालावधीत झाली. कॉंग्रेस आणि भाजपाने गोव्याची फक्त लुटच केली. दोन्ही पक्षांची सरकारे भ्रष्ट म्हणून ओळखली गेली.

मागील 10 वर्षात भाजप सत्ताकाळात प्रशासन पूर्णपणे कोलमडले. दहा वर्षात 20 ते 22 हजार कोटींचे कर्ज सरकारने काढले. कर्ज काढून विकासाचे ढोल बडवीत तिजोरीची प्रचंड मोठी लूट केली नोकऱ्यांची विक्री चालू केली. भाजप सत्ता काळात बेकारीचे प्रमाण 35 टक्के पर्यंत पोहोचले. 2012 साली भाजपने खाण (Mining) व्यवसाय बंद करून खाणपट्ट्यात हाहाकार उडवून दिला. खाण बंदीमुळे बेकारीत भर पडली. खाण गावापाशी संबंधित उद्योग बंद पडले.

बॅंकाची कर्जे लाखांच्या गळ्याला लागली, लोक कर्जबाजारी झाले. हलाखीतत दिवस काढण्याची पाळी लोकांवरती आली. उच्च शिक्षणावर परिणाम झाला. भवितव्य धुसर बनले. अनेक संसार उधवस्त झाले आणि त्यासाठी भाजप सरकारच पूर्णपणे कारणीभूत झाले. 2012 ते आजपर्यंत प्रत्येक निवडणूकीत (Election) खाणी सुरू करण्याचे फसवे आश्‍वासन देऊन भाजपने मते वळवली. भाजपच्या फसव्या कारणांनी गोमंतकीयांची भवितव्य नष्ट केली. मुख्यमंत्र्यासह भाजपच्या अनेकांनी प्रचंड लूट केली. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने दशहतीचे राजकारण सुरु केले. ज्यामतदारांनी भाजपाला सत्तेवर आणले तेच आज दहशतीखाली जगत आहेत. जनतेचे जगण्याचे स्वातंत्र्य भाजपाने हिरावून घेतले आणि विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने एक भूमिका घेऊन भाजपाला सहकार्य केले.

आज गोवा (Goa) एक प्रचंड मोठा आगडोंब अशा स्थितीत आहे. तोंड दाबून बुक्याचा मार अशी स्थिती लोकांची झाली आहे. अशा स्थितीत केवळ मगो पक्षा हाच एक आधार आहे. मगो सोज्वळ, स्वच्छ जनताभिमूख सरकार गोवेकरांनी पाहिले आहे. त्यामुळे आज लोक मगो पक्षाकडे अपेक्षेने पाहत आहे. मगो पक्षाला गोव्याची आणि गोव्यातील जनतेची काळजी आहे. गोवा राखण्यासाठी आणि नव्या पिढीचे भवितव्य घडवण्यासाठी म.गो. पक्ष हाच एक पर्याय आज गोव्यात आहे. दहा वर्षाच्या सत्ता काळात भाजपने प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला. तिजोरीची लूट मोठ्या प्रमाणात केली गेली. विकास कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. नोकऱ्या विकण्याचे काम भाजप सरकारच्या काळात झाले. युवकांना नोकऱ्याचे केवळ आमीष दाखवले गेले. युवा वर्गाची मोठी फसवणूक भाजपने केली. आज बेकारीचे प्रमाण प्रचंड मोठे असून त्याला केवळ भाजप सरकार जबाबदार आहे. अकार्यक्षम मुख्यमंत्री (CM) देऊन भाजपने गोव्याची पूर्णपणे वाट लावली. एक असफल मुख्यमंत्री अशी प्रतिमा तयार झाली आहे.

या सरकारच्या काळात महागाईने कळस गाठला. मागील पाच वर्षात महागाईत तीनशे ते पाचशे पटीने वाढ झाली आहे. जनता कंगाल आणि महागाईचा कहर अशी स्थिती आहे. नोकऱ्या नाहीत, आर्थिक उत्पन्न नाही, धंदे व्यवसाय बंद अशी स्थिती सध्या गोव्यात आहे. भाजपला सत्ताभ्रष्ट करून गोव्यात जनताभिमुख सरकार आणण्यासाठी मगो हा एकमेव पर्याय आहे. मगोचे सरकार पुन्हा सत्तेवर येणे ही काळाची गरज आहे. यामुळे तमाम युवक, सुजाण नागरिक आणि माता, भगिनी यांचा आशीर्वाद मतांच्या रुपाने मगो पक्षाच्या उमेदवारांना देणे हाच एक पर्याय सध्या आमच्या समोर आहे. म. गो. पक्ष सुशासन आणि जनकल्याणकारी सरकार देण्यास कोक घगत एक नोकरी आणि मंद व्यवसायात बादी हा मगोचा संकल्प आहे. त्याचबरोबर सुजलाम सुफलाम् गोवा हे मगोचे (MGP) ध्येय आहे. चला तर मग एकसंघ होऊन राज्यात पुन्हा एकदा मगो आणण्यासाठी कटीबध्द होऊया. 14 फेब्रूवारी हा आपले भवितव्य घडवणारा दिवस आहे याची जाणीव ठेऊन सत्ताबदल घडविण्यासाठी सज्‍ज होऊया.

ह्यासाठी मगो पक्षाने तृणमुलसोबत युती करून गोव्यात एक नवी सकाळ देण्याचा संकल्प केला आहे. चला तर मग 14 फेब्रूवारीला मगो तृणमुल युतीच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करूया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT