डिचोली-मयेत भाजपची प्रतिष्ठा पणाला, नगरसेवक कोणाबरोबर?

विरोधकांची सक्षम मोर्चेबांधणी, शह-काटशहांना ऊत
bicholim-mayem Constituency
bicholim-mayem ConstituencyDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : सक्षम कार्यकर्त्यांची फौज पदरी असून देखील भारतीय जनता पक्षाला डिचोली आणि मये या भरवशाच्या मतदारसंघात विरोधकांनी घाम काढला आहे. डिचोली मतदारसंघातील ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातही अनिश्चिततेचे वातावरण आहे. येथे तिहेरी लढत अपेक्षित असून अपक्ष उमेदवार चंद्रकांत शेट्ये यांनी प्रचारात घेतलेली आघाडी भाजप व मगोच्या उमेदवारांची अस्वस्थता वाढवून राहिली आहे. शेट्ये कुणाची मते फोडतात, यावर निवडणुकीचा (Election) निकाल अवलंबून असेल.

भाजप आणि मगोसमोर आव्हान आहे, ते आपली मतपेढी सुरक्षित ठेवण्याचे. 2017 सालच्या निवडणुकीत भाजपचे राजेश पाटणेकर (10,654) आणि मगोपचे नरेश सावळ (9988) यांच्या मतांतली तफावत अवघी 666 मतांची होती. दोघांपैकी जो कुणी आपली मतपेढी अभंग राखील त्याचा विजय निश्चित आहे. पण डॉ. शेट्ये यांनी दोन्ही पतपेढ्यांना बरेच हादरे दिले आहेत आणि आपली बाजू कोणत्याही बाबतीत कमी पडणार नाही, याची दक्षता ते आजही घेत आहेत. शेवटच्या क्षणी मतपरिवर्तनासाठी यत्न केले जाण्याची शक्यता गृहीत धरून त्यांचे कार्यकर्ते मोर्चेबांधणी करताना आज दिसून आले.

bicholim-mayem Constituency
फातोर्डासह मडगाव मतदारसंघातील उमेदवारांसाठी आनंदाची बातमी

सद्यःस्थितीत त्यांनी भाजप (BJP) आणि मगोचीही बरीच मते यशस्वीपणे आपल्या बाजूने वळवल्याचे दिसते. साळ येथील मेघश्याम राऊत हे कॉंग्रेसच्या (Congress) उमेदवारीवर रिंगणात आहे, असे असतानाही त्या गावातून साठ टक्के मते मिळतील, असा दावा शेट्ये यांचे समर्थक करतात. मुळगाव या दुसऱ्या महत्त्वाच्या ग्रामक्षेत्रातही शेट्ये यांनी बरीच मुसंडी मारली आहे. भाजप आणि मगोपची बहुसंख्य मते शेट्येंच्या प्रभावाखाली आल्यास त्यांची सरशी होईल.

नगरसेवक कोणाबरोबर?

डिचोली (Bicholim) शहरातील मतदार काही प्रमाणात मुस्लीमवाडा वगळता भाजपासोबत राहिला आहे. मात्र भाजपच्या कार्यकाळात पक्षाने या मतदारसंघाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा सल पक्षाचे समर्थकच बोलून दाखवतात. अनेकांनी पर्यायांचा गांभीर्याने विचार चालवला असल्याचेही चर्चेअंती दिसून येते. भाजपचे म्हणवणारे काही नगरसेवकही मनःपूर्वक पक्षासोबत आहेत का? असा प्रश्नही पडतो. येत्या दोन दिवसांत यावर तोडगा काढणे अशक्य नसले तरी कठीण निश्चितपणे आहे. शहरी मतांचे प्रमाण रोडावणे भाजपला परवडणारे नाही.

मतविभागणीचा फटका

मये (mayem) मतदारसंघात प्रेमेंद्र शेट यांच्यामागे भाजपाने आपली ताकद उभी केली असली तरी या पक्षाचा पारंपरिक मतदार मात्र गोंधळलेल्या मनःस्थितीत असल्याचे दिसते. अपक्ष उमेदवार मिलिंद पिळगावकर, आम आदमी पक्षाचे राजेश कळंगुटकर आणि भाजपने तिकीट नाकारल्यामुळे मगोतर्फे उभे राहिलेले प्रविण झाट्ये यांचा डोळा भाजपच्या मतांवर असणे स्वाभाविक आहे. प्रत्येकाला ठरावीक क्षेत्रातून प्रतिसादही मिळतो आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांचा पल्ला यावेळी गाठता येणार नाही, हे निश्चित आहे. उपरोक्त तीन उमेदवार पक्षाची किती मते खातात, मतविभागणी कशी होणार, यावर निकाल अवलंबून असेल.

bicholim-mayem Constituency
सांताक्रुझमध्ये टोनी ‘धर्मसंकटात’?

अल्पसंख्यांकांवर लक्ष

गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) संतोष सावंत यांच्यासाठी त्यांच्या पक्षाबरोबर कॉंग्रेसनेही जोर लावल्याचे दिसते. सावंत यांनी चोडणमधील अल्पसंख्यांकांच्या मतांवर लक्ष केंद्रित करत तिथे जम बसवल्याचे दिसते. मयेतील काही भागातून तसेच पिळगाव- नार्वेतूनही त्यांना प्रतिसाद मिळतो आहे. गेल्या निवडणुकीत त्याना साडेसात हजार मते मिळाली होती. तीच त्यांनीी याही वेळेस राखली तर ते विजयाच्या समिप पोहोचू शकतात. भाजपला त्या निवडणुकीत साडेबारा हजार मते मिळाली होती. त्यातली किती दुरावतात यावर भाजपचे भविष्य अवलंबून असेल.

पक्षनिष्ठा गौण

भावी उमेदवारांमुळे या मतदारसंघातली पक्षनिष्ठा गौण झाल्याचेही चित्र दिसते. तरीही भाजप संघटनेची येथे विशेष पडझड झालेली नाही, याची नोंद घ्यावी लागेल. अमित शहा, अरविंद केजरीवाल यांच्या प्रचारातील उपस्थितीने मयेतील राजकारणाची रंगत वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com