रवी नाईकांच्या विरोधात मगोपसह कॉंग्रेस, कोण मारणार बाजी?

फोंड्यात सात उमेदवार रिंगणात
Ponda BJP Candidate Ravi Naik
Ponda BJP Candidate Ravi NaikDainik Gomantak

फोंड्यात सध्या कुरुक्षेत्राचे वातावरण तयार झाले असून कोण कोठे जातो हेच कळेनासे झाले आहे. मागे शिवाजी महाराजांच्या काळात मावळे कसे हर हर महादेव म्हणत युध्दात झोकून द्यायचे तशी स्थिती फोंड्यातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची झाली आहे. कोण शत्रू किंवा कोण मित्र हेच कळेनासे झाले आहे.

परवा शेवटच्या टपप्यात मगोपच्या जाहीरसभेत फोंड्याचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक तसेच भाजपचे माजी गटाध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनी मगोपचे (MGP) उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.

Ponda BJP Candidate Ravi Naik
मुलींचे शिक्षण विनामुल्य, गोव्यासाठी आदित्य ठाकरेंनी केला अजेंडा जाहीर

निवडणूकीला (Election) दोन दिवस असताना घेतलेली त्यांची कलाटणी अनेकांना विस्मयात टाकून गेली. हे करताना त्यांनी भाजप त्यागत असल्याचे मात्र सांगितले नाही. फोंड्यात भाजप चा उमेदवार असताना भाजपचा (BJP) एक ज्येष्ठ पदाधिकारी जाहीपणे मगोपला पाठिंबा कसा देऊ शकतो याचे मात्र आकलन झाले नाही. असे प्रकार फोंड्यात शेवटपर्यंत दिसायला लागले आहेत. नदीचे कुळ व मुळ जसे सांगता येत नाही तसेच कार्यकर्त्यांचे झाले आहे. मात्र सर्व नद्या जशा सागराला मिळतात तसे हे कार्यकर्ते कोणाला यशाच्या सागरात नेतात हे पाहावे लागेल.

सध्या फोंड्यात सात उमेदवार रिंगणात असून रवी नाईक (Ravi Naik) हे यापैकी सर्वात अनुभवी उमेदवार. शेवटच्या क्षणी पत्ते खोलणारे म्हणून ते ओळखले जात असून त्यांच्यात चाली या प्रसंगानुरुप असतात. सध्या त्यांच्याबरोबर मुळ भाजपवासी फोंड्याचे गटाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक विश्वनाथ दळवी माजी नगरसेवक अॅड मनोहर आडपईकर व यशवंत खेडेकर तसेच रवीचे मुळ समर्थक माजी नगराध्यक्ष किशोर नाईक, कुर्टी खांडेपार पंचायतीचे पंच दादी नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्ते फिरताना दिसत आहेत.

Ponda BJP Candidate Ravi Naik
मुख्यमंत्र्यानी अगोदर आपल्या मतदार संघात लक्ष द्यावे; जित आरोलकर

आपल्या कार्याची मतदारांना माहिती असल्यामुळे आपल्याला विशेष प्रचार करावा लागत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या विरोधात असलेले कॉंग्रेसचे (Congress) राजेश शेट वेरेकर हे ही अंतिम टप्प्यात सक्रीय झाले असून ते व त्यांचे सहकारी गटाध्यक्ष जॉन परेरा नगरसेवक विल्यम आगियार, व्यंकटेश नाईक हे जोमाने कार्य करताना दिसताहेत. आपण प्रचाराचे तीन टप्पे पूर्ण केले असल्याचे कॉंग्रेस कार्यकर्ते सांगताना दिसतात. मगोपचे डॉ. केतन भाटीकर यांनी प्रचाराचा अंतिम टप्पा गाठला असून काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रचाराला अभिनेते फिरोज खान हे आले होते. फिरोजांच्या हवेली कुर्टी येथे झालेल्या बैठकीला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. अर्थात या प्रतिसादाचे मतदानात रुपांतर होते की नाही हे बघायला हवे.

मागे 2012 साली भारतीय संघाचे माजी कप्तान अजरुद्दीन हे कॉंग्रेसचे उमेदवार तथा तत्कालीन गृहमंत्री रवी नाईक यांच्या समर्थनाला आले होते. त्यांच्या रोडशो लाही जबरदस्त प्रतिसाद लाभला होता. एवढे होऊनही रवींना त्या निवडणूकीत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे सेलिब्रेटींची उपस्थिती मतदानात बदलू शकते असे नाही.आता फिरोज ची उपस्थिती काय कमाल करू शकते हे पाहावे लागेल. या तीन उमेदवारांबरोबर कुर्टी खांडेपार पंचायतीचे माजी सरपंच संदीप खांडेपारकर हे ही अपक्ष म्हणूनरिंगणात आहेत ते एकेकाळी भाजपचे क्रियाशील कार्यकर्ते होते. पण त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळेत्यांनी पक्ष त्याग करून अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली.

त्यांनीही बहुतेक मतदारांशी संपर्क साधल्याचे कळते. यांच्याशिवाय आपचे अॅड सुरेल तिळवे व रिव्होल्युशनरी गोवन्सचे सनिष तिळवे हे रिंगणात आहेत. त्याबरोबर नरेश पडवळकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. फोंड्यात (Ponda) भाजप-कॉंग्रेसची स्वतःची अशी मते आहेत मागच्या वेळी भाजपच्या सुनिल देसाईना 6400 मतेप्राप्त झाली होती. तर कॉंग्रेसतर्फे रवी नाईकांनी 9450 मते घेऊन विजय हासिल केला होता. आता समीकरणे बदलली असली तरी कॉंग्रेस व भाजपचे पारंपरिक मतदार आपल्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतात. असा तर्क व्यक्त होत आहे.रवी सारखा अनुभवीउमदेवार रिंगणात असल्यामुळे ते कोणता करिष्मा दाखवतात ते बघावेलागेल. आता रवींचा अनुभव कामाला येतो, मगोप व कॉंग्रेसच्या उमेदवारांना कसे तोंड देतात अपक्ष संदीप काय चमत्कार करतात याची उत्तरे येत्या काळात मिळणार हे निश्चित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com