CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोव्याच्या मुद्द्यांवर गृहमंत्री अमित शहा आणि CM प्रमोद सावंत यांच्यात दिल्लीत बैठका

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दाबोळी विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला

दैनिक गोमन्तक

पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्ली दौरा संपला असून, ते दिल्लीहून गोव्याला परतले आहेत. दरम्यान त्यांनी दाबोळी विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगीतले.

(Meetings between Home Minister Amit Shah and CM Pramod Sawant in Delhi on all Goa issues)

या दरम्यान राज्याचा विकास, प्रगती आणि राज्यातील खाणकाम यासह गोव्याच्या सर्व मुद्द्यांवर गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची पहिल्यांदाच भेट

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिल्लीत देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड (Vice President Jagdeep Dhankhar) यांची भेट घेतली. धनकड उपराष्ट्रपतीपदी निवडून गेल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पहिल्यांदाच त्यांची भेट घेतली आहे. त्यापूर्वी मंगळवारी सावंत यांनी महाराष्ट्रात लोकमत अवॉर्डमध्ये उपस्थिती लावली.

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात 2 लाख नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार- मुख्यमंत्री सावंत

गोव्यात येत्या पाच वर्षांत पर्यटनाच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात दोन लाखांपेक्षा अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या संधीचे गोमंतकीयांनी सोने करावे, अन्यथा बाहेरील लोक येऊन त्याचा फायदा घेतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. दरम्यान, या संधीचे सोने केल्यास गोव्यात कुणीही बेरोजगार राहणार नाही, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण!देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

Yuri Alemao: 'नोकरी घोटाळ्यातील सूत्रधार समोर यावा'! 'Cash For Job' वरुन आलेमाव यांची मागणी

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

SCROLL FOR NEXT