Goa Tourism: गोवा पर्यटकांनी गजबजला; व्यावसायिकांचीही चांदी

यंदाच्या हंगामाची सुरुवात दणक्यात झाल्याने व्यावसायिकही सुखावले
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील कळंगुट आणि कांदोळी सारखे समुद्रकिनारे दसऱ्याच्या सुट्टीत गोव्यात पर्यटकांनी खचाखच भरले होते. तसेच आता ही पर्यटकांची रेलचेल सुरु झाली असुन काही समुद्रकिनाऱ्यांकडे पर्यटकांचा ओघ जोरात सुरू झाला आहे. पर्यटन विभागाने अनेक ऑपरेटर्सना परवाने दिल्याने या हंगामाची सुरुवात दणक्यात झाल्याचे दिसत आहे.

(This year Goa’s hotspot beaches like Calangute and Candolim were packed with tourists )

Goa Tourism
Calangute Beach: समुद्रकिनारी मद्यपान करणाऱ्यांना आवरण्याची गरज

कळंगुट येथे शॅक असणाऱ्या एका व्यावसायिकाने याबाबत सांगितले आहे की, हा हंगाम जोरात सुरू झाला असुन देशी पर्यटक येऊ लागले आहेत. आणि शॅक मालक म्हणून आमच्यासाठी ही चांगली बाब आहे. आम्ही सध्या दिवाळीच्या सुट्ट्यांची वाट पाहत आहोत, कारण या कालावधीत गोव्यात स्थानिक पर्यटकांचा ओघ जास्त असतो. तोपर्यंत आमचे शॅक देखील या पर्यटकांच्या स्वागतासाठी पूर्णपणे तयार असती असे ते म्हणाले.

Goa Tourism
Goa: दाबोळीचे "घोस्ट एअरपोर्ट" करण्यासाठीच टॅक्सीवाल्यांना दोष; युरी अलेमाव यांचा आरोप

कळंगुटमध्ये बाइक भाड्याने देणारी एजन्सी असलेला व्यावसायिक म्हणाला की, या पर्यटन हंगामाची तसेच सलग सुट्ट्या, सण येण्याची वाट आम्ही वाट पाहत होतो. सध्या आमची जवळपास 60-70% वाहने भाड्याने दिली आहेत. त्यापैकी बहुतेक नॉन-गिअर बाईक आहेत आणि काही कार देखील आहेत. मला विश्वास आहे की, जर या हंगामाची सुरुवात अशी चांगली झाली आहे, तर उर्वरित हंगाम, म्हणजेच दिवाळी ख्रिसमस नवीन वर्षाच्या सुट्ट्यांसाठी देखील आणखी पर्यटक गोव्याकडे वळणार आहेत.

कुटुंबासह गोव्यात आलेले काही पर्यटक म्हणाले की, हे वातावरण आम्हाला खूप आवडले. आम्ही दरवर्षी गोव्यात येत असतो, पण महामारीच्या काळात आम्हाला फारसे बाहेर जाण्याची संधी मिळाली नाही. आता मुलांना सुट्ट्या असल्याने आम्ही हंपीहून गोव्याला आलो आहे. आम्हाला हणजूणाला जायला आवडते आणि तिथे राहणाऱ्या आमच्या मित्रांसोबत मस्ती करायला आवडते. त्यामूळे पुढील काही दिवस आम्ही गोव्यात आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com