medical report that the dead body found in the Tilari river belongs to a laborer from Maharashtra and he was murdered Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: मणेरीतील 'तो' मृतदेह महाराष्ट्रातील मजूराचा; मेडिकल रिपोर्टमधून मोठा खुलासा

Goa Crime News: मागील दोन वर्षांपासून हा मजूर डिचोलीत होता व त्याला ‘पावण्या’ या नावाने ओळखले जात होते, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime News: मणेरी-दोडामार्ग येथील तिळारी नदीपात्रात अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळलेला तो मृतदेह मजुराचा असून त्याचा खून झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. मागील दोन वर्षांपासून हा मजूर डिचोलीत होता व त्याला ‘पावण्या’ या नावाने ओळखले जात होते, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. त्यामुळे या खुनामागे डिचोलीचे कनेक्शन आहे काय? खून झालेला हा मजूर मूळ महाराष्ट्रातील अंबेजोगाई - बीड येथील होता. या मजुराचे नाव बाळासाहेब ऊर्फ बालाजी रामभाऊ कांबळे असे आहे.

बावीस दिवसांपूर्वी खुनाचा प्रकार

गेल्या ४ मे रोजी तिळारी नदीपात्रात काही युवक आंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना अत्यंत कुजलेल्या अवस्थेत एकाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या उजव्या हातावर ‘बालाजी’, ‘ज्योती’ आणि ‘लक्ष्मी’ व डाव्या हातावर ‘लक्ष्मी’ अशी नावे गोंदवली होती. त्यामुळे ही व्यक्ती डिचोलीच्या बाजारात काम करणारे बालाजीच असल्याचे स्पष्ट झाले होते. बालाजी याचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज होता. मात्र, वैद्यकीय अहवालात त्याचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट होताच, महाराष्ट्र पोलिसांनी (Police) खुनाचा गुन्हा नोंद करून तपासाला गती दिली.

खून करून मृतदेह नदीत फेकला

बालाजीचा खून करून नंतर पुलावरून त्याचा मृतदेह नदीपात्रात टाकला असावा असा पोलिसांचा कयास आहे. बालाजी याचा खून झाल्याचे उघड झाले असले, तरी तो कोणत्या गावचा आणि मणेरीत कसा पोचला याबद्दल गुंता होता. मात्र, महाराष्ट्र पोलिसांनी बालाजीची माहिती मिळवण्यात यश मिळवले.

पोलिसांसमोर आव्हान

बालाजी कांबळे याची ओळख पटविण्यात महाराष्ट्र (Maharashtra) पोलिसांना यश आले असले, तरी या खून प्रकरणाचा गुंता सोडविणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे. बालाजी डिचोलीत राहत असे. तेथे ‘पावण्या’ या नावाने ओळखण्यात येणारा बालाजी गेल्या २५ एप्रिलपासून गायब होता. डिचोलीतून तो मणेरीत कसा आला याचा शोध घेणे सुरू अहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्रिपद नाही पण मायकल लोबोंना महामंडळ मिळाले; माजी उपमुख्यमंत्री कवळेकरांना कला अकादमीच्या अध्यक्षपदाची लॉटरी

Shetkari Aadhar Nidhi Scheme: पावसानं झोडपलं, सरकारनं सावरलं, 'डिसेंबरपर्यंत प्रति हेक्टर 40 हजार भरपाई देणार'; CM सावंतांची मोठी घोषणा

Bicholim: डिचोलीत दिवसाढवळ्या इमारतीचे गेट तोडताना परप्रांतीय युवकाला पकडले

Goa Live Updates: खोर्लीत शुक्रवारी आकाशकंदील स्पर्धा

फोंड्यात उभा राहणार रवी नाईक यांचा पुतळा; पालिकेने घेतले तीन महत्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT