Malyachi Jatra Mayem Dainik Gomantak
गोवा

Malyachi Jatra 2026: मयेत ‘माल्याची’ जत्रा होणारच! मुळगावसह देवीची पेठ पारंपरिक ठिकाणी स्थानापन्न

Malyachi Jatra Mayem: मये येथील प्रसिद्ध ''माल्या''च्या जत्रेच्या पार्श्वभूमीवर मुळगावच्या ''केळबाई''च्या पेठेचे (मंगळवारी) मये गावात आगमन झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: मये येथील प्रसिद्ध ''माल्या''च्या जत्रेच्या पार्श्वभूमीवर मुळगावच्या ''केळबाई''च्या पेठेचे (मंगळवारी) मये गावात आगमन झाले आहे. या पेठेसह मयेच्या देवीची पेठही पारंपारीक ठिकाणी स्थानापन्न झाली आहे.

मुळगावसह मयेतील देवीची पेठ पारंपरिक ठिकाणी नेताना यंदाही मागील दोन वर्षांप्रमाणे परंपरा खंडित झाली असली, तरी गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही माल्याची जत्रा होणार असल्याचे स्पष्ट आहे. तशे संकेत मिळाले असून, भाविकभक्तांना तसा आशावादही आहे. मये येथील प्रसिद्ध ''माल्या''ची जत्रा येत्या गुरुवारी (ता. २६) साजरी करण्यात येणार आहे.

दरम्यान, यापूर्वीच्या वादाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन पेठेच्या आगमनावेळी मये येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनासह पोलिस अधिकारी लक्ष ठेवून होते.

मुळगावची पेठेची जत्रा मये येथील ''माल्या''च्या जत्रेशी जोडली गेली आहे. त्यानुसार माल्याच्या जत्रेच्या आधी तीन दिवस परंपरेप्रमाणे मुळगावची पेठ मये गावात नेण्याची परंपरा आहे.

सोमवारी रात्री मुळगाव येथील केळबाई मंदिरात देवीची पेठ फुलांनी सजविण्यात आली. मध्यरात्री शेकडो भक्तगणांच्या साक्षीत वाजतगाजत आणि देवीच्या जयघोषात या पेठेचे मये गावात जाण्यासाठी प्रस्थान झाले. व्हाळशी, बोर्डे, पाजवाडामार्गे मार्गक्रमण करीत ही पेठ आज (मंगळवारी) पहाटे मये गावात दाखल झाली. वाटेत सर्वत्र भाविकांनी पेठेची सेवा करुन कौल घेतला.

यंदाही परंपरा खंडित

मुळगावची पेठ मये येथील श्री केळबाई मंदिरात पोचताच पारंपरिक विधी करून मुळगावसह आणि मये येथील देवीची पेठ सोबतच चव्हाट्यावर नेण्याची परंपरा आहे. मात्र गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही या परंपरेत खंड पडला.

पहाटे आगमन झाल्यानंतर मुळगावची पेठ केळबायवाडा येथील श्री केळबाई देवीच्या मंदिरात गेली खरी, मात्र ही पेठ आत न जाता मंदिराच्या दरवाजावरून परस्पर चव्हाटा याठिकाणी नेण्यात आली. मागाहून सायंकाळी येथील मयेच्या केळबाई देवीची पेठ सजविण्यात आली. पुजाअर्चा आदी पारंपरिक विधी पार पाडण्यात आल्यानंतर मयेची पेठ गावकरवाडा येथील चव्हाट्यावर नेण्यात आली. दोन्ही पेठांचे तीन दिवस मये येथील चव्हाट्यावर वास्तव्य असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

Goa Weather: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी, पण गर्मीतून अद्याप सुटका नाही

Goa Infrastructure: डांबरीकरण खोळंबले, बेंजो वाजवून निषेध; मिशन फॉर लोकलतर्फे आंदोलन, आमदार प्रवीण आर्लेकरांवर टीका

SCROLL FOR NEXT