Pilgao: ''पुंडलिक वर दे हरि विठ्ठल"!शेकडो वर्षांची परंपरा, पिळगावात होमकुंड उत्साहात

Pilgao Homkund Utsav: पिळगाव येथील होमकुंड उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. (रविवारी) मध्यरात्री एक वाजता पारंपरिक पद्धतीने होमकुंड पेटविण्यात आले.
Pilgao Homkund Utsav
Pilgao Homkund UtsavDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: अग्निदिव्य आदी पारंपरिक कार्यक्रम आणि शेकडो भक्तगणांच्या साक्षीत पिळगावची ग्रामदेवता श्री शांतादुर्गा देवीचा वार्षिक होमकुंड उत्सव मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात आला.

पिळगाव येथील होमकुंड उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. (रविवारी) मध्यरात्री एक वाजता पारंपरिक पद्धतीने होमकुंड पेटविण्यात आले. नंतर व्रतस्थ धोंड भक्तगण पवित्र तळीवर शुचीर्भूत होऊन आल्यानंतर मध्यरात्री तीन वाजता होमकुंड उत्सव साजरा करण्यात आला.

''श्री शांतादुर्गा माता की जय'', ''पुंडलिक वर दे हरि विठ्ठल'' आदी जयघोष करीत भक्तगणांसह कलशधारी अवसारी मोडाने नाचत अग्निदिव्य केले. नंतर पहाटे पारंपरिक पद्धतीने कौलोत्सव होवून या उत्सवाची सांगता झाली. कळसोत्सवानिमित्त दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. अग्निदिव्याची अनुभूती घेण्यासाठी होमकुंडस्थळी आबालवृद्धांनी गर्दी केली होती.

Pilgao Homkund Utsav
बोर्डे, डिचोली येथे बुधवारी 'होमकुंड' उत्सव, तयारी पूर्ण; वडेश्वर देवाच्या प्रांगणात भरणार उत्सव, व्रतस्थ भक्तगण करणार अग्निदिव्य

पूर्वीच्या काळी गुढीपाडव्याच्या दिवशीच हा कळस उत्सव साजरा करण्यात येत असे. मात्र लोकवस्ती वाढल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या उत्सवाचे दिवस वाढवण्यात आले आहेत. गेल्या वर्षीपर्यंत हा उत्सव तीन दिवस साजरा करण्यात येत होता. मात्र घरे वाढल्याने यंदा हा उत्सव एका दिवसाने वाढविण्यात आला होता.

Pilgao Homkund Utsav
Zambaulim Gulalotsav: ‘श्री रामनाथ दामोदर महाराज की जय'! जांबावलीचा वैभवशाली गुलालोत्सव

गिमोणे येथील प्रभू श्री रामचंद्र मंदिर, पांडवकालीन चंद्र सूर्य (चांद, सूर्य) प्रतिमा कोरलेल्या पाषाणावर विधिवत पूजन झाल्यानंतर रात्री उशिरा पारंपरिक वाटेने कलशाचे मंदिरापाशी आगमन झाले. मध्यरात्री होमकुंड उत्सव साजरा करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Chief Minister’s t Scheme
Bombay High Court Goa Bench
Shirgao Lairai Jatra
Bombay High Court Goa Bench Judgment
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com