Gram Sabha Dainik Gomantak
गोवा

Mayem Gram Sabha : बार, गोशाळा, ‘प्रोटोकॉल’ चर्चेत ; मयेच्या ग्रामसभेत गदारोळ

मये ग्रामसभा गाजली : कार्यक्रमात सरपंचांना मागे बसवल्याने संताप

गोमन्तक डिजिटल टीम

Mayem Gram Sabha : मये, मयेतील दारूची दुकाने बंद करावीत, गोशाळेमुळे होणारे प्रदूषण तसेच लाखो चौ. मी. सरकारची जागा गोशाळेसाठी अडवून ठेवणे, सरकारी कार्यक्रमात प्रोटोकॉल न पाळणे आदी विषयावरून मयेच्या ग्रामसभेत गदारोळ माजला.

घरमालकांना सनद वितरण समारंभात प्रोटोकॉल पाळला नाही. सरपंच गावच्या प्रथम नागरिक असतानाही त्यांना मागच्या रांगेत बसवल्याबद्दल सुभाष किनळकर यांनी संताप व्यक्त केला.

यापुढे असे प्रकार घडू नयेत, आणि प्रोटोकॉलप्रमाणेच सरकारी कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, असा ठराव संमत करण्यात आला.

इतर ग्रामसभा सदस्यांसह गौसेवक कमलाकांत तारी आणि आरजी कार्यकर्त्यांनी या विषयावरून चर्चा केली.मयेची ग्रामसभा रविवार २९ रोजी सकाळी पंचायत सभागृहात उपसरपंच सुफला चोपडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी विद्यानंद कारबोटकर, वासुदेव गावकर, सुवर्णा चोडणकर, कृष्णा चोडणकर विशांत पेडणेकर, सीमा आरोंदेकर, दिलीप शेट, विनीता पोळे, कनीवी कवठणकर,वर्षा गडेकर आदी पंच व सचिव प्रणय गावडे आदी मंचावर उपस्थित होते.

मयेतील गोशाळेत हजारो गुरे आणून ठेवली असून त्यांच्या शेणमूताच्या दुर्गंधीने आजार होण्याची संभावना आहे. तसेच मृत गुरांचे अवयवही इतरत्र पसरल्याने रोग पसरण्याची भीती असल्याचा विषय ‘आरजी’ कार्यकर्ते नितीन गोवेकर यांनी उपस्थित केला.

या गोशाळेसाठी बांधलेल्या शेड पंचायत दफ्तरी नोंद आहेत का, गुरांसाठी पाण्याची व्यवस्था कशी होते, असेही आरजी कार्यकर्त्यांनी विचारले. सखाराम पेडणेकर,सुभाष किनळकर, नितीन गोवेकर,कमलाकांत तारी व इतर ग्रामस्थांनी चर्चा केली.

दारू दुकानांना परवाने मिळतातच कसे ?

मयेतील दारूच्या दुकानांसंदर्भात कमलाकांत तारी यांनी प्रश्न उपस्थित केला. दारूमुळे कित्येक संसार उद्ध्वस्त होत आहेत. या व्यसनांमुळे आजची पिढी बरबाद होतानाचे चित्र विदारक आहे.

मयेत आणखी बारना परवाने देऊ नयेत, असा ठराव ग्रामसभेने संमत केला असतानाही नवे परवाने कसे देण्यात आले, असा मुद्दा तारी यांनी उपस्थित केला. यावर सुभाष किनळकर यांनी तारी यांना न्यायालयात दाद मागण्याची विनंती केली.

गोशाळा मयेतील गुरांसाठी आहे. संपूर्ण गोव्यातील गुरे आणून येथे ठेवू नये. आज आम्हा मयेवासीयांनाच पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना एवढ्या गुरांना पाणी कसे पुरणार.

गोशाळेतील शेड, शेणमुताचा निचरा याबाबतीत पंचायत सखोल चौकशी करून पुढच्या ग्रामसभेत अहवाल सादर करील.

-वासुदेव गावकर,

पंचायत सदस्य मये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

Creative Minds of Tomorrow मध्ये 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी..

SCROLL FOR NEXT