Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : चार वर्षानंतर मयेत होणार ‘रेड्या’ची जत्रा; भाविकांना दिलासा

Bicholim News : न्यायालयाच्या निर्देशानुसार आज (सोमवारी) सायंकाळी डिचोलीत झालेल्या प्रशासकीय बैठकीत जत्रा शांततेने साजरी करा, अशी स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांनी नाईक गट आणि अन्य सेवेकऱ्यांना केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर मये येथील प्रसिद्ध ''रेड्या''ची जत्रा (व्हडली जत्रा) यंदा साजरी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मयेतील प्रसिद्ध ''माल्या''ची जत्रा यंदा साजरी होवून ‘माले’ पेटल्याने रेड्याची जत्रा साजरी होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले होते.

तरीदेखील यापुर्वीचा वाद पाहता, या जत्रेबाबत धाकधूक निर्माण झाली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार आज (सोमवारी) सायंकाळी डिचोलीत झालेल्या प्रशासकीय बैठकीत जत्रा शांततेने साजरी करा, अशी स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांनी नाईक गट आणि अन्य सेवेकऱ्यांना केली आहे.

त्यामुळे उद्या (मंगळवारी) रेड्या ची जत्रा सुरळीतपणे शांततेत साजरी होणार असल्याचे चांगलेच संकेत मिळाले आहेत.

अशी साजरी होतेय जत्रा : मयेतील रेड्याच्या जत्रेला मोठा इतिहास आहे. परंपरेप्रमाणे जत्रेच्या दिवशी सायंकाळी माशेलहून श्री देवकीकृष्ण, श्री पिसो रवळनाथ आणि श्री पुरुष या देवतांच्या तरंगांचे जलमार्गे मये गावात पारंपरिक ठिकाणी आगमन होत असते. नंतर मध्यरात्री रेड्याची जत्रा साजरी होत असते. दुसऱ्या दिवशी परंपरेप्रमाणे कौलोत्सव साजरा करून तिन्ही तरंगे माघारी जातात.

प्रशासकीय बैठक

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज (सोमवारी) सायंकाळी डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात देवस्थान समिती, नाईक गट आणि देवस्थानशी संबंधीत अन्य सेवेकरी यांची संयुक्त बैठक बोलावली होती.

उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली. या बैठकीस मामलेदार विमोद दलाल, पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर आदी अधिकारी उपस्थित होते. बैठकीस नाईक गट आणि अन्य सेवेकरी उपस्थित होते.

मयेतील जत्रा शांततेत होऊदे ः उच्च न्यायालय

पणजी,मयेतील जत्रेविषयीचा वाद मिटावा आणि जत्रा मंगळवारी शांततेत, वादविवाद आणि तंटे न होता पार पाडावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने डिचोलीच्या मामलेदारांना सोमवारी संध्याकाळी मंदिराच्या समिती, गावकऱ्यांची आणि नाईक गटाची संयुक्त बैठक घेण्याचा आदेश दिला.

यंदा माल्याची आणि रेड्याची जत्रा स्थगित करत असल्याची नोटीस १३ एप्रिल रोजी देवस्थान समितीने एक नोटीस जारी केली होती. तरीदेखील इतर सेवेकऱ्यांनी पुढाकार घेत १६ एप्रिल रोजी माल्याची जत्रा साजरी केली होती. त्यामुळे रेड्याची जत्रा होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT