PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

PM Modi In Goa:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी कळसा भंडुरा प्रकल्प, नोकरी, जमीन रुपांतरण याबाबत मोदी भाष्य करणार का? असा प्रश्न केला आहे.
Amit Patkar, Narendra modi
Amit Patkar, Narendra modiDainik Gomantak

PM Modi In Goa

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सांकवाळ येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होत आहे. मोदींच्या सभेपूर्वी काँग्रेसने पंतप्रधानावर प्रश्नांचा भडीमार केला असून, मोदी या प्रश्नांची उत्तरे देणार का? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी कळसा भंडुरा प्रकल्प, नोकरी, जमीन रुपांतरण याबाबत मोदी भाष्य करणार का? असा प्रश्न केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्यात खंडणीबहाद्दर संकल्प आमोणकर यांच्यासोबत व्यासपिठावर बसलेले देशवासीय पाहणार आहेत, असा खोचक टीका अमित पाटकर यांनी केलीय.

तसेच, भारतीय संविधानाचा खून करणारे दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, मायकल लोबो, दिलायला लोबो, रुडॉल्फ फर्नांडिस, राजेश फळदेसाई आणि केदार नाईक यांच्यासोबत बसलेले नरेंद्र मोदी देश बघणार आहे, असे पाटकर म्हणाले.

पाटकरांनी म्हादईबाबत देखील भाष्य करत, कर्नाटकच्या कळसा भांडुरा प्रकल्पाला दिलेली मंजुरी मागे घेण्याची घोषणा मोदी गोव्यात करणार का? असा प्रश्न पाटकर यांनी उपस्थित केला.

Amit Patkar, Narendra modi
Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

याशिवाय गोव्यात होत असलेल्या मोठ्या जमीन रुपांतरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली भूमिका स्पष्ट करतील याची गोवा वाट पाहत असल्याचे पाटकर म्हणाले.

1.20 लाख गोव्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक नोकरीचे नियुक्ती पत्र मिळण्याची वाट पाहत असल्याचे पाटकर म्हणाले.

गोवा मुक्तिच्या 60 वर्षांच्या स्मरणार्थ 300 कोटींच्या वचन दिलेल्या रकमेतून 150 कोटी प्रलंबित आहेत, त्या रक्कमेचा धनादेश पंतप्रधान घेऊन येण्याची वाट गोमन्तकीय पाहत आहेत, असे पाटकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com