Maye Women Gomantak Digital Team
गोवा

Maye News : मयेत माल्याच्या जत्रेचा वाद चिघळला

मारहाणीत रूपांतर : बालिकेसह सातजण जखमी; सहाजणांना अटक

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली : मये येथील श्री माया केळबाई पंचायतन देवस्थानच्या प्रसिद्ध ‘माल्याच्या जत्रे’ला तणावाचे गालबोट लागले. जत्रेवरून निर्माण झालेला वाद अखेर चिघळला आहे. जत्रेच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून श्री केळबाई देवीचे मंदिर बंद असल्याने झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले.

या मारहाणीवेळी एक कारगाडी फोडून घरावरही दगडफेक करण्यात आली. यावेळी एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. हा प्रकार आज (बुधवारी) दुपारी घडला. जमावाने केलेल्या मारहाणीवेळी मिस्ती परब ही पाच वर्षीय बालिका जखमी झाली. या बालिकेसह लवू परब, मयूर परब, मुकुंद प्रभुगावकर, राजेश परब, सुरेश परब आणि महादेव परब हे जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, मारहाणीनंतर दुपारपासून मयेत तणावग्रस्त वातावरण असून, गावकरवाडा येथील श्री महामाया मंदिर परिसरात पोलिस फौजफाटा तैनात केला आहे. पोलिस अधिकारी मयेतील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

डिचोली पोलिस स्थानकावर रात्री उशिरापर्यंत महिलांचा जमाव

मारहाणप्रकरणी परब गटातर्फे पोलिसांत सतरा जणांविरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीला अनुसरून डिचोली पोलिसांनी सायंकाळी भादंसंच्या 307 कलमाखाली गुन्हा दाखल करून नाईक गावकर गटातील सहाजणांना अटक केली.

त्यांना अटक करताच त्यांच्या सुटकेसाठी नाईक गावकर गटातील महिला मिळून दोनशेहून अधिक लोकांनी डिचोली पोलिस स्थानकावर धडक दिली. रात्री उशिरापर्यंत महिलांचा जमाव पोलिस स्थानकाबाहेर होता. दरम्यान, आमच्या गटातील एका युवकाला मारहाण करणाऱ्यांना अटक करा, अशी मागणी नाईक गावकर गटाची आहे. याप्रकरणी राजकीय हस्तक्षेप झाल्याचा दावाही या गटाने केला आहे.

वादाची पार्श्वभूमी...

सोमवारी (ता.27) श्री केळबाई मंदिराचा मुख्य दरवाजा बंद ठेवल्याने पहाटे मये गावात आलेली मुळगावची पेठ मंदिरात न आणता परस्पर चव्हाट्यावर नेण्यात आली. तर मयेच्या केळबाई देवीची पेठ मंदिरातच बंदिस्त राहिली. आज (बुधवारी) जत्रेचा मुख्य दिवस असताना आणि डिचोलीच्या मामलेदारांनी नोटीस काढूनही मंदिर खुले करण्यात आले नसल्याने सकाळपासूनच नाईक गावकर गट संतप्त आणि आक्रमक बनला. नंतर महिलांसह या गटातील लोक गावकरवाडा येथे गेले. त्याठिकाणी झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले.

अधिकारी अडकले : या घटनेनंतर संतप्त बनलेल्या गावकरवाडा येथील महिलांसह लोकांच्या जमावाने त्याठिकाणी आलेले डिचोलीचे उपजिल्हाधिकारी आणि मामलेदार यांना घेराव घातला. मारहाण करणाऱ्या संशयितांना कठोर कलमाखाली अटक करा, अशी मागणी परब गटातील लोकांनी लावून धरली. हे अधिकारी सायंकाळी उशिरापर्यंत गावकरवाडा येथे अडकून पडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Coconut Price Goa: 45 रुपयांचा नारळ स्वस्त कसा? विजय सरदेसाईंचा सवाल

SCROLL FOR NEXT