Mapusa Municipality Budget 2023: नगरसेवकांच्या हरकतींनंतर अंदाजपत्रकात केली सुधारणा

म्हापसा पालिकेचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर
Mapusa Municipal Council
Mapusa Municipal CouncilDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Municipality Budget 2023: नगरपालिकेने २०२३-२४ सालच्या आर्थिक वर्षासाठी ८.६० कोटी रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर केला. या अंदाजपत्रकावरील चर्चेवेळी अनेक आकडेवारींवर काही नगरसेवकांनी जोरदार हरकत घेतल्याने नंतर त्यात सुधारणा करण्यात आली.

नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.२९) म्हापसा पालिका मंडळाची विशेष बैठक झाली. यावेळी मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर, उपनगराध्यक्ष विराज फडके उपस्थित होते.

मात्र, नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर वगळता इतर नगरसेवक हजर राहिले. लेखापाल फळदेसाई यांनी अंदाजपत्रकातील मुद्यांचे वाचन केले.

Mapusa Municipal Council
Ponda Muncipality Budget: फोंडा पालिकेचे 78 कोटींचे शिलकी अंदाजपत्रक !

या अंदाजपत्रकात सुरुवातीची शिल्लक ४६.८० कोटी रुपये आहे. २०२३-२४ सालासाठी प्राप्ती ६६.०६ कोटी रुपये तर खर्च ६५.१६ कोटी रुपये आहे. चर्चेनंतर ४७.६६ कोटी रुपयांचे हे अंदाजपत्रक सर्वांनुमते मंजूर करण्यात आले.

पालिकेचे एकूण अंदाजपत्रक ११२.८२ कोटी रुपयांचे आहे. २०२३-२४ चा सर्वसाधारण महसूल ४५.११ कोटी आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी घरे आणि भाडे करातून १४ कोटी रुपये, बेकायदेशीर घरांना घरपट्टी लागू करून १० लाख रुपये उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.

औद्योगिक वसाहतीच्या शेडवर रु. ८ कोटी कर, घरोघरी व मार्केटमधील कचरा कर २.५८० कोटी रुपये, व्यापार, व्यावसायातील कर १.४० कोटी रुपये, जाहिराती, साइनबोर्ड, पोस्टर्स इत्यादीवरील करातून ४० लाख रुपये, सोपो करातून ३.२० कोटी रुपये उत्पन्न, पे पार्किंगमधून ६० लाख रुपये उत्पन्न, इमारत, दुकाने, स्टॉल्सच्या भाड्याचे उत्पन्न ७.५० कोटी, बांधकाम शुल्कातून रु. ४.५० कोटी, तर पालिकेच्या नि धीवरील बँकांकडून येणारे व्याज १.६६ कोटी रुपये आहे.

सरकारी अनुदानाची प्रतीक्षा

पालिकेला १५ व्या वित्त आयोगानुसार ५ कोटी रुपयांचे सरकारी अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे. सरकारकडून शहर विकास प्रकल्पांसाठी ५ कोटी अनुदान, तर भटकी गुरे व लहान प्राणी व्यवस्थापनासाठी २ कोटी रुपये विशेष अनुदान अपेक्षित आहे, असे सांगण्यात आले.

Mapusa Municipal Council
Margao Muncipality : मडगाव नगराध्‍यक्षांची एकाधिकारशाही : नगरसेवक आमोणकर

वाढीव कराला आक्षेप

नगराध्यक्षांनी नवीन आर्थिक वर्षात घरपट्टीच्या माध्यमातून १४ कोटी रुपये संभाव्य महसूल मिळेल, असे म्हटले. मात्र, या आकड्याला संबंधित नगरसेवकांनी हरकत घेतली. कुठल्या आधारावर तुम्ही हा भरमसाट आकडा सांगता?

जनतेवर वाढीव कर कशासाठी, असे म्हणत नगरसेवक सुधीर कांदोळकर, अ‍ॅड. शशांक नार्वेकर, कमल डिसोझा, अन्वी कोरगावकर, केयल ब्रागांझा यांनी त्याला विरोध दर्शविला. मात्र, नगरसेविका शुभांगी वायंगणकर याविषयी तटस्थ राहिल्या.

Mapusa Municipal Council
Goa Budget 2023: 26844 कोटींचा अर्थसंकल्‍प, ग्रामीण जीवनमान उंचावण्‍याचे लक्ष्‍य

अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी

शहरातील कचरा व्यवस्थापनात सुसूत्रता आणून पुनर्मुल्यांकनाचे काम मार्गी लावणार

ढेपाळलेल्या प्रशासकीय कामकाजात सुधारणा करणार

ग्रंथालय सुरू करण्यासोबत नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण करणार

Mapusa Municipal Council
Vijai Sardesai on Goa Budget 2023: जुन्या बाटलीत जुनेच पेय, पण नवीन लेबल

म्हापसा पालिकेचा २०२३-२४ सालासाठीचा अर्थसंकल्प बुधवारी मांडला. २०१४ साली पालिका क्षेत्रातील महसूल प्राप्ती भांडवलाचे मूल्यांकन झाले होते. त्यानंतर यंदा हे मूल्यांकन हाती घेतले. प्रलंबित प्रकल्पांतील दुकाने पावणीला काढली जातील. त्यानुसार पालिकेचा महसूल वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- प्रिया मिशाळ, नगराध्यक्षा, म्हापसा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com