Malyachi Jatra Mayem  Dainik Gomantak
गोवा

Mayem: ‘माले’ पेटले, देवीचा ‘पण’ही पूर्ण! मयेतील ‘माल्या’ची जत्रा उत्साहात, ‘चव्हाटा’ ठिकाणी ‘पेठ’ जाण्याच्या परंपरेत खंड

Malyachi Jatra Mayem: मये येथील श्री माया केळबाई पंचायतन देवस्थानची प्रसिद्ध ‘माल्या’ची जत्रा अखेर अभूतपूर्व उत्साहात आणि सुरळीतपणे साजरी झाली.

Sameer Panditrao

डिचोली: मयेवासीयांसह तमाम भाविकांचे लक्ष लागून राहिलेल्या मये येथील श्री माया केळबाई पंचायतन देवस्थानची प्रसिद्ध ‘माल्या’ची जत्रा अखेर अभूतपूर्व उत्साहात आणि सुरळीतपणे साजरी झाली. सोमवारी (ता.७) पहाटे जत्रेचे वैशिष्ट्य असलेले ‘माले’ पेटले आणि ‘माले’ डोक्यावर घेऊन नृत्य करण्याचा देवीचा ‘पण’ ही पूर्ण झाला.

रविवारी (ता.६) सुरू झालेल्या या जत्रेची आज (सोमवारी) पहाटे हजारो भक्तगणांच्या साक्षीत परंपरेप्रमाणे कोणत्याही विघ्नाशिवाय उत्साहात सांगता झाली. मुळगाव येथून देवीची पेठ मये येथील श्री केळबाई देवीच्या मंदिरात आल्यानंतर पारंपरिक विधी करण्यात येतात. त्यानंतर मयेतील देवीची मिळून दोन्ही पेठ सोबतच चव्हाटा या स्थानी नेण्याची परंपरा आहे. .

गेल्या शुक्रवारी पहाटे मुळगाव येथील देवीची पेठ शेकडो भक्तगणांच्या साक्षीत वाजतगाजत मये येथील श्री केळबाई देवीच्या मंदिरात आली होती. मात्र, मुळगावची पेठ परंपरेप्रमाणे मंदिरात आत न जाता मंदिराच्या प्रवेशद्वारावरूनच परस्पर चव्हाटा या स्थानी गेली होती.

मुळगावची पेठ चव्हाटा स्थानी गेल्यानंतर नाईक गटातील लोकांनी अवसारी मोडाकडून कौल घेऊन श्री केळबाई देवीची पेठ सजवून तासाभराने वाजतगाजत आणि शेकडो भक्तांसह चव्हाटा याठिकाणी नेऊन स्थानापन्न केली होती. मुळगाव आणि मयेची पेठ चव्हाटा याठिकाणी स्थानापन्न झाल्या होत्या खऱ्या. मात्र, दोन्ही पेठ सोबतीने चव्हाटा याठिकाणी जाण्याच्या पूर्वापारपासून चालत आलेल्या परंपरेत मात्र यंदाही खंड पडला. तरीदेखील गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही ‘माल्या’ची जत्रा उत्साहात साजरी करण्यात आली

भाविकांनी घेतले दोन्ही ‘पेठां’तील देवतांचे दर्शन

माल्याच्या जत्रेनिमित्त रविवारी (ता.६) सकाळपासूनच मये गावात उत्साहाचे वातावरण पसरले होते. सायंकाळी राज्याच्या हजारो भक्तांची पावले मये गावाकडे वळत होती. रात्री भाविकांच्या गर्दीत प्रचंड वाढ झाली होती. भाविकांनी चव्हाटास्थानी असलेल्या दोन्ही ‘पेठां’तील देवतांचे दर्शन घेतले. परंपरेप्रमाणे मध्यरात्री मुळगावचे धोंड आणि इतर भक्तगण मये गावात आले. अन्य मानकरी येताच मुळगावच्या भाविकांनी देवीची पेठ सजवून पारंपरिक कार्यक्रम करून ‘पेठ’ घेऊन मुळगावला जाण्यासाठी मार्गस्थ झाले.

नंतर मयेतील श्री केळबाई देवीची ‘पेठ’ही सजवून परंपरेप्रमाणे चव्हाटा स्थळावरून श्री महामाया मंदिरापाशी नेण्यात आली. त्यानंतर परंपरेप्रमाणे वाजतगाजत चव्हाट्यावर आणलेले ‘माले’ सोमवारी (ता.७) पहाटे प्रज्वलित करून मोडाच्या डोक्यावर ठेवण्यात आले. नंतर पेरणीगीत व अवसरासह ‘माले’ नृत्याचा थरार सुरू झाला. माल्याच्या जत्रेवेळी पेटते ‘माले’ डोक्यावर घेऊन नृत्य करण्याचा श्री केळबाई देवीचा ‘पण’ही पूर्ण झाला. ‘माले’ उत्सव झाल्यानंतर परंपरेप्रमाणे या जत्रोत्सवाची सांगता झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran Peace Deal: "आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही!" नेतन्याहूंच्या मंत्र्याचा ट्रम्प यांच्या शांतता करारावर थेट हल्ला; जागतिक राजकारणात खळबळ

Brazil Helicopter Crash: ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच भीषण टक्कर; 6 जणांचा मृत्यू, कार डीलरशिपच्या पार्किंगमध्ये कोसळल्याने 20 वाहने खाक VIDEO

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

SCROLL FOR NEXT