Mavin Gudinho  Dainik Gomantak
गोवा

माविन यांचा जमिनीवर दरोडा; काँग्रेसचा आरोप

काँग्रेसचा आरोप : मिनी इंडिया प्रकल्प चिखलीला नेण्याचा डाव

दैनिक गोमन्तक

पणजी: केळशी कोमुनिनाद येथे मिनी इंडिया प्रकल्प आणण्याचा डाव ग्रामस्थांनी उधळून लावला. त्यामुळे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी तो प्रकल्प चिखली येथे नेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याठिकाणची एक लाख चौ. मी. जमीन पुण्याच्या व्यक्तीला विकण्याचा त्यांचा डाव आहे. राज्यातील जमिनीवर गुदिन्हो यांचा हा दरोडा टाकण्याचा डाव असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे व्हेरिएतो फर्नांडिस यांनी केला आहे.

(Mavin Gudinho robbery on the ground; Goa Congress alleges)

काँग्रेस भवनात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी संजय बर्डे, दाबोळी गट काँग्रेसचे अध्यक्ष वसंत नाईक व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. फर्नांडिस म्हणाले की, 26 जून रोजी चिखली येथे विशेष बैठक आयोजिली आहे. या बैठक आयोजनामागे जमीन ताब्यात घेण्याविषयीचा ठराव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केळशी येथे मिनी इंडिया प्रकल्प आणण्याचे माविन यांचे प्रयत्न ग्रामस्थांनी सफल होऊ दिले नाहीत. त्याठिकाणी 1 लाखपेक्षा अधिक चौ. मी. जागा या प्रकल्पासाठी घेतली जाणार होती. तेथील लोकांनी विरोध केल्याने माविन यांनी चिखली येथे हा प्रकल्प नेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याप्रसंगी वसंत नाईक यांनी सांगितले की, चिखली कोमुनिदाद येथील जागा पूर्वजांनी सांभाळून ठेवली आहे. त्‍या जमिनीचे संरक्षण करण्याची जबाबदारी लोकांची आहे. लोकांनी 26 रोजीच्या होणाऱ्या बैठकीत येणारा ठराव मंजूर करू नये. दरम्‍यान, याबाबत गुदिन्‍हो यांच्‍याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

जमीन विकण्याचा डाव

पुण्याच्या राम अगरवाल यांना ही जमीन विकण्याचा त्यांचा डाव आहे. 26 रोजी जी बैठक बोलाविली आहे, त्यात सर्वे क्र. 4/1 या जागेवर उद्यानाचा ठराव मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्याचे फर्नांडिस म्हणाले. त्यासाठी चिखली येथे कोमुनिदादकडून एक शेअर खरेदी केला आहे. त्यामागे जमीन विक्री करण्याचा डाव असल्याचा आरोप व्हेरिएतो फर्नांडिस यांनी केला.

कोणाला जमिनी दिल्या, बंगले बांधून दिले हे सर्व आता बाहेर काढले जाईल. गुदिन्हो यांचा सर्व लेखाजोखा आम्ही आता जनतेसमोर मांडणार आहोत. 26 जूनला होणाऱ्या या बैठकीकडे आमचे लक्ष असेल.

- व्हेरिएतो फर्नांडिस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT