Court Canva
गोवा

Goa Crime: विवाहिताकडून 18 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, पूर्वीही गुन्हा नोंद; न्यायालयाकडून तिसऱ्यांदा जामीन नामंजूर

Goa Sexual Assault Case: संशयिताने पीडित तरुणीला प्रेमात अडकवून लैंगिक अत्याचार केला. तो विवाहित असतानाही त्याने हे कृत्य केले. कुटुंबाकडे अधिक लक्ष देण्याऐवजी त्याने हे गंभीर कृत्य केले.

Sameer Panditrao

पणजी: विवाहित असूनही तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित अफझल ऊर्फ अल्बाझ खान याला जलदगती विशेष न्यायालयाने (पोक्सो) तिसऱ्यांदा जामीन फेटाळला. एका अल्पवयीन मुलीवरील यापूर्वी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंद झाला होता, मात्र बाल न्यायालयाने त्याला निर्दोष ठरवले होते.

त्यामुळे संशयित अशाच प्रकारचा गुन्हा पुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निरीक्षण आदेशात नोंदवले आहे. संशयिताने पीडित तरुणीला प्रेमात अडकवून लैंगिक अत्याचार केला. तो विवाहित असतानाही त्याने हे कृत्य केले. कुटुंबाकडे अधिक लक्ष देण्याऐवजी त्याने हे गंभीर कृत्य केले. पीडितेला त्याची माहिती कळताच तो तिला टाळायला लागला.

त्यामुळे तिने ही तक्रार दाखल केली होती. संशयिताविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत. यापूर्वी म्हापसा पोक्सो न्यायालयाने तसेच पणजी सत्र न्यायालयाने त्याला जामीन फेटाळला होता. पीडितेची जबानी न्यायालयात नोंद झाली असली तरी इतर साक्षीदारांची जबानी नोंद व्हायची आहे. त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये, अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली. त्याला अटक केल्यापासून तो कोठडीत आहे व त्याच्याविरुद्ध गुन्ह्याचे थेट पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत, अशी बाजू संशयिताच्या वकिलांनी मांडली.

गुन्हा गंभीर व घृणास्पद

न्यायालयातील खटल्यावेळी सरकारी वकिलांकडून साक्षीदार सादर करण्यात विलंब झालेला नाही. संशयित कर्नाटकचा असल्याने तो फरारी होऊ शकतो व खटल्यावरील सुनावणीस उपस्थित राहणार नाही. संशयिताने केलेला गुन्हा गंभीर व घृणास्पद आहे. त्याची पत्नी व मुले असताना त्याने १८ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे त्याला जामीन देणे योग्य दिसत नाही असे निरीक्षण न्यायालयाने आदेशात केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: अमित पाटकरांच्या तक्रारीवर आमदार कार्लुस फेरेरा हसले; म्हणाले, 'ते बालिश आणि इमॅच्युर कृत्य'

पेपरफुटी प्रकरणातील प्राध्यापकाचा जीवन संपविण्याचा प्रयत्न, गोव्यात सोलर - इलेक्ट्रिक क्रूझ बोटीचे उद्धाटन; वाचा ठळक बातम्या

Annabhau Sathe: अण्णांचा रशिया दौरा कसा होता? तेथील धर्म, वर्ण, स्त्री समानता याबाबत त्यांनी काय निरीक्षण नोंदवले?

Murder Trial: मांगोरहिल - वास्को खून प्रकरणात अझीम शेख दोषी; सोमवारी काय सुनावली जाणार शिक्षा?

'कौशल्याधारित हरित रोजगार भविष्याची गरज'; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो

SCROLL FOR NEXT