
Asia Cup 2025 Final India vs Pakistan
आशिया कप २०२५ चा थरारक अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघानं उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानवर सहज मात करत नवव्यांदा आशिया चषक जिंकला आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव अपेक्षेप्रमाणे उभा राहू शकला नाही. चांगल्या सुरुवातीनंतरदेखील संपूर्ण संघ फक्त १९.१ षटकांत १४६ धावांवर गारद झाला.
विजयासाठी भारताला १४७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांनी आत्मविश्वासपूर्ण खेळ करत सामना आपल्या नियंत्रणात ठेवला. दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ विकेट्स राखत हे लक्ष्य पार केलं. भारतानं नवव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं आहे.
पाकिस्तानने दिलेल्या १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. २० धावांवर भारताचे तीन विकेट गेले. अभिषेक शर्मा (५), कर्णधार सूर्यकुमार यादव (१) आणि शुभमन गिल (१२) १२ धावांवर बाद झाले. त्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी चौथ्या विकेटसाठी ५० चेंडूत ५७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर अबरार अहमदने संजू सॅमसनला बाद केले. संजूने २१ चेंडूत २४ धावा केल्या, त्यात दोन चौकार आणि एक षटकार मारला.
त्यानंतर तिलक वर्मा आणि शिवम दुबेने पाचव्या विकेटसाठी ६० धावा जोडल्या आणि संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला. नंतर, फरीम अशरफने दुबेला बाद केले, ज्यामुळे सामना थोडा रोमांचक झाला. शिवम दुबेने २२ चेंडूत ३३ धावा केल्या, ज्यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकार मारले.
साहिबजादा फरहानने दमदार खेळ करत ३८ चेंडूत ५७ धावांची खेळी साकारली. मात्र त्याच्या बाद होण्यानंतर पाकिस्तानचा डाव कोसळला. फखर जमानने ३५ चेंडूत ४६ धावा आणि सैम अयुबने ११ चेंडूत १४ धावा केल्या. याशिवाय कोणताही फलंदाज विशेष कामगिरी करू शकला नाही.
कर्णधार सलमान अली आघा फक्त ८ धावा करून माघारी परतला. तर हुसेन तलत (१), मोहम्मद नवाज (६), हरिस रौफ (६) यांनीही निराशा केली. विशेष म्हणजे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले.
भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवने पुन्हा एकदा आपल्या भेदक गोलंदाजीने पाकिस्तानचा कणा मोडला. चार षटकांत ३० धावा देऊन त्याने चार महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, एका षटकात त्याने सलग तीन विकेट्स काढत पाकिस्तानच्या डावाचा पूर्ण तोल ढासळवला.
कुलदीप यादवच्या चार विकेट व्यतिरिक्त, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह यांनीही प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आणि पाकिस्तानला १४६ धावांवर गुंडाळले.
भारत : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तान : साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आगा (कॅप्टन), हुसैन तलत, मोहम्मद हरिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि अबरार अहमद.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.