Crime News: सहल जीवावर बेतली! मित्रांसोबत नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय युवकाचा मृत्यू

Drawining Case: उस्ते सत्तरीत येथील म्हादई नदीत २४ वर्षीय राजेश सिंग याचा बुडून मृत्यू झाला. कुंकळ्ळी येथील रहिवाशी असलेल्या राजेश सिंग आपल्या तीन मित्रांसह म्हादई नदीत सहलीसाठी गेला होता.

पणजी: उस्ते सत्तरीत येथील म्हादई नदीत २४ वर्षीय राजेश सिंग याचा बुडून मृत्यू झाला. कुंकळ्ळी येथील रहिवाशी असलेल्या राजेश सिंग आपल्या तीन मित्रांसह म्हादई नदीत सहलीसाठी गेला होता. नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या राजेशला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडला आणि त्याचा मृत्यू झाला.

मृत्यूची माहिती मिळताच, वाळपई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनांमुळे परिसरात शोककळा पसरली असून राजेश सिंगच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. पोलीसांकडून या घटनेचा तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com