drunken disturbance Goa
drunken disturbance GoaDainik Gomantak

Goa Crime: म्हापश्यात 2 महिलांचा दारू पिऊन राडा! भररस्त्यात फोडली बाटली; सुरक्षा कर्मचाऱ्यांशी केले गैरवर्तन

Colvale intoxicated women chaos: या महिलांनी भर रस्त्यात धिंगाणा घातल्याने वाहतुकीसाठी प्रचंड अडथळा निर्माण झाला, तसेच रुग्णालयातही कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले
Published on

म्हापसा: उत्तर गोव्यातील म्हापसा शहरात कोलवाळ येथे दोन महिलांनी मद्यधुंद अवस्थेत मोठा गोंधळ घातल्याची घटना समोर आली. या महिलांनी भर रस्त्यात धिंगाणा घातल्याने वाहतुकीसाठी प्रचंड अडथळा निर्माण झाला, तसेच रुग्णालयातही कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या दोन्ही महिला मूळच्या महाराष्ट्रातील एका गावातील असल्याची माहिती उघड झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार (दि. २७) रोजी ही घटना कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहाच्या समोर असलेल्या सर्व्हिस रोडवर घडली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या दोन महिला रस्त्याच्या मधोमध बसून मद्यपान करत होत्या आणि त्यामुळे वाहतुकीसाठी बराच खोळंबा निर्माण झाला होता. या महिलांनी भर रस्त्यात एका बाटलीची तोडफोड केली आणि मोठ्या प्रमाणात आरडाओरडा करून गोंधळ घालायला सुरुवात केली, यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी तातडीने पोलिसांना आणि १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला.

रुग्णवाहिकेने दोन्ही महिलांना म्हापसा येथील उत्तर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, इथेही त्यांचा गोंधळ थांबला नाही. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाखल केल्यानंतर एका महिलेने तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले, तर दुसरी महिला बेशुद्ध झाली होती.

drunken disturbance Goa
Drunk and Drive: सावधान! नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात जाताय? मद्यपी वाहनचालकांवर असणार बारीक नजर

काही वेळानंतर शुद्धीवर आलेल्या महिलेने पुन्हा एकदा रुग्णालयाबाहेर रस्त्याच्या मधोमध बसून गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली.

म्हापसा पोलिसांना या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. महिलेच्या मद्यावस्थेतील वागणुकीमुळे पोलिसांना तिला शांत करणं आणि ताब्यात घेणं कठीण झालं होतं. अखेर पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनंतर तिला ताब्यात घेतलं असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

सध्या गोव्यात विविध ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून, दोन्ही महिला नेमक्या कोणत्या कारणास्तव गोव्यात आल्या होत्या आणि त्यांनी असा प्रकार का केला, याचा शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com