Goa Liberation Day Dainik Gomantak
गोवा

Goa Liberation Day: बोरी पूल स्‍फोटकांनी उडवला; मडगावलाही जाणवला हादरा

Goa Liberation Day: मुक्तिदिनाच्या निमित्ताने जुन्या घटना, आठवणींना उजाळा

सुशांत कुंकळयेकर

Goa Liberation Day: 1961 सालच्‍या डिसेंबर महिन्‍याच्‍या मध्‍यासच गोव्‍यातील लोकांना गोवा मुक्‍तीचे वेध लागले होते. कारण 14 डिसेंबर रोजी गोव्‍याच्‍या सीमेवर भारतीय सैन्‍याची जमवाजमाव सुरू झाली होती. मात्र 18 डिसेंबरपर्यत फारशा काही हालचाली न झाल्‍याने लोक अस्‍वस्‍थ झाले होते.

देशाचे तत्‍कालीन उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांना ही कारवाई नको होती, तर संरक्षणमंत्री कृष्‍ण मेनन हे कारवाई करण्‍यावर ठाम होते. या अशा परिस्‍थितीत 17 डिसेंबर रोजीच भारतीय लष्‍कर गोव्‍याच्‍या हद्दीत घुसू लागले होते.

‘आझाद गोमंतक’ दलाचे आघाडीचे नेते आणि नंतर गोव्‍याचे माजी पोलिस महानिरीक्षक प्रभाकर सिनारी यांनी आपल्‍या ‘ऑपरेशन विजय’ या लेखात गोव्‍याच्‍या या कारवाईबद्दल लिहिले आहे. त्‍यांचे हे वर्णन म्‍हणजे, भारतीय लष्‍करी कारवाईचा ‘आँखो देखा हाल’ असेच म्‍हणावे लागेल.

प्रभाकर सिनारी हे त्‍यावेळी भारतीय सैन्‍याच्‍या ४-राजपूत या तुकडीसह माजाळी येथे ठाण मांडून बसले होते. 18 डिसेंबर रोजी ही तुकडी काणकोणात आत शिरली. मात्र त्‍यापूर्वी पोर्तुगीज सैनिकांनी आपल्‍या लष्‍करी डावपेचाचाच एक भाग म्‍हणून वाटेवरील बरेचसे पूल स्‍फोटकाद्वारे उडवून लावले होते. त्‍यापैकी एक पूल होता तो बोरीचा. १८ डिसेंबर रोजी पोर्तुगीजांनी मोठ्या प्रमाणावर स्‍फोटके वापरून बोरीचा पूल उडवून लावला होता. त्‍या हादऱ्याचा आवाज एवढा मोठा होता की त्‍यामुळे मडगावही हादरले.

अशा परिस्‍थितीत मडगावातील लोकांमध्‍ये एकाबाजूने गोवा मुक्‍तीची आस आणि दुसऱ्या बाजूने पोर्तुगीज कारवाईची भीती अशी मिश्र संवेदना होती. त्‍यातच काहीजणांनी ‘पाखले परत आले’ अशी अफवा उडवून लोकांमधील घबराट अधिकच वाढवली होती. असे असताना भारतीय सैन्‍याने खास रणगाड्यांच्‍या साहाय्‍याने बोरी नदी पार करून १९ डिसेंबर रोजी सायंकाळी मडगावात प्रवेश केला आणि मडगावकरांमध्‍ये एक चैतन्‍याचे वातावरण निर्माण झाले, असे सिनारी यांनी आपल्‍या लेखात लिहून ठेवले आहे.

सिनारी यांनी जी माहिती दिली आहे त्‍याप्रमाणे, काणकोणहून मडगावकडे कूच करण्‍याची सुरूवात 18 डिसेंबर रोजीच झाली होती. मात्र पोर्तुगीजांनी अर्धफोंडचा पूल उडवून लावला होता. तरीही या सर्व अडथळ्‍यांवर मात करून माजाळीहून निघालेली तुकडी १९ डिसेंबर रोजी मडगावात शिरली. त्‍यांनी मडगावचे पोलिस मुख्‍यालय आणि इतर सरकारी इमारतींचा ताबा घेतला. त्‍यावेळी मडगाववासीयांनी या तुकडीचे जल्‍लोषाने स्‍वागत केले.

खास रणगाड्यांच्‍या साहाय्‍याने नदी केली पार

दुसऱ्या बाजूने भारतीय सैन्‍याची 63 इन्‍फ्रंट्री ब्रिगेड ही तुकडी सकाळी 6 वाजता फोंड्याहून बोरीला येण्‍यास निघाली होती. सकाळी 9.30 वाजता ती बोरी पुलावर पोचली असता, बोरी पूल उडवून टाकल्‍याचे त्‍यांच्‍या लक्षात आले.

मात्र आपल्‍याकडे असलेल्‍या रणगाड्यांचा वापर करून त्‍यांनी नदी पार केली आणि १९ डिसेंबरच्‍या सायंकाळी चारच्‍या सुमारास ही तुकडीही मडगावात दाखल झाली. ‘ऑपरेशन विजय’ या मोहिमेचे प्रमुख असलेले जनरल कॅडेथ हे हेलिकॉप्‍टरमधून मडगावच्‍या राजेंद्र प्रसाद स्‍टेडियमवर उतरले. त्‍यावेळी हजारोंच्‍या संख्‍येने लोक स्‍टेडियमवर दाखल झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant: कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्यावरुन संतापले गोव्याचे मुख्यमंत्री; शांतता आणि एकतेवर हल्ला असल्याची टीका

Panaji: अजगराला फरफटत नेणे, ओढून त्रास देणे भोवले; वन विभागाने घेतली दखल, गुन्हा नोंद

Cuchelim Comunidad: 140 बांधकामांवर फिरणार बुलडोझर! कुचेली कोमुनिदाद जागेत अतिक्रमण; उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

गोव्यातील बेकायदेशीर घरांना वीज आणि पाणी कनेक्शन मिळणार नाही: मुख्यमंत्री सावंत असं का म्हणाले?

Goa Opinion: कुछ भी करो, चलता है! गोव्याला जबाबदार पर्यटक अन् कठोर नियमांची गरज

SCROLL FOR NEXT