Margao Well Drowning Death Dainik Gomantak
गोवा

Tragic Death: काळीज पिळवटले! खेळता खेळता पडला विहिरीत, मृत्यूशी दिली झुंज; 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

Margao Well Drowning Death: सदर घटना मंगळवारी ४ नोव्‍हेंबर रोजी सदुबांद-मडगाव येथे घडली होती. त्‍या दिवशी दुपारी दोनच्‍या सुमारास अभिषेक हा खेळत असताना घराशेजारीच असलेल्‍या विहिरीत पडला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: घराबाहेर खेळत असताना विहिरीत पडलेल्या अभिषेक मलिक या तीन वर्षीय बालकाला अखेर मृत्‍यूने गाठलेच. उपचारासाठी त्याला गोमेकॉत दाखल करण्‍यात आले होते. तेथे त्याची प्राणज्‍योत मालवली.

सदर घटना मंगळवारी ४ नोव्‍हेंबर रोजी सदुबांद-मडगाव येथे घडली होती. त्‍या दिवशी दुपारी दोनच्‍या सुमारास अभिषेक हा खेळत असताना घराशेजारीच असलेल्‍या विहिरीत पडला होता. त्या विहिरीला कठडा नव्हता.

शेजारील लोकांच्‍या लक्षात ही घटना आल्‍यानंतर काहींनी विहिरीत उडी मारून अभिषेकला पाण्‍याबाहेर काढले आणि लागलीच दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने नंतर त्याला गोमेकॉत हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला वाचविण्याचे शर्थीने प्रयत्न केले. परंतु काल बुधवारी त्याचा मृत्यू झाला.

मलिक कुटुंबीय हे मूळ बिहार राज्यातील आहे. अभिषेकचे वडील कामगार असून, घटनेच्या दिवशी ते काही वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात गेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. सर्व सोपस्‍कार करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. अनैसर्गिक मृत्यू म्हणून मडगाव पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शुभम गावकर पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: खाऊसाठी दोन खारुताईंमध्ये गोड मारामारी; ये व्हिडिओ आपका दिन बना देगा Watch

Chorla Ghat Update: गोवा–कर्नाटक रस्ता धोकादायक! चोर्ला घाटात खड्ड्यांचे साम्राज्य; कणकुंबी मार्गाने प्रवास करणे ठरतेय जीवघेणे

VIDEO: 6,6,6,6,6,6... एका षटकात 38 धावा, 12 चेंडूत ठोकलं अर्धशतक, आफ्रिदीची तुफान फटकेबाजी; पाहा व्हिडिओ

Karachi Art Council: पाकिस्तानमध्ये बांगलादेशी, हिंदू कलाकारांची धूम! 18 वर्षांनंतर गाजवले स्टेज; कराची महोत्सवात 140 देशांचा सहभाग

Valvanti River: सजवलेल्या 30 नौका, दिव्यांची रोषणाई; विठ्ठलापुरात 'त्रिपुरारी' पौर्णिमेचा जल्लोष