Goa Death News
Tragic DeathDainik Gomantak

Tragic Death: दुर्दैवी! तिसऱ्या मजल्यावरून तोल गेला, थेट कोसळला खाली; इमारतीवरून पडून गवंडी ठार

Goa Zuarinagar Worker Death: परिसरात सुरू असलेल्या बांधकामस्थळी झालेल्या दुर्दैवी अपघातात एका गवंडी मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर खाली उभ्या असलेल्या अल्पवयीन मुलगी जखमी झाली.
Published on

झुआरीनगर: परिसरात सुरू असलेल्या बांधकामस्थळी झालेल्या दुर्दैवी अपघातात एका गवंडी मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर खाली उभ्या असलेल्या अल्पवयीन मुलगी जखमी झाली. ही घटना सोमवारी घडली. मृत मजुराचे नाव तरबेज आलम (वय ३४, मूळ बिहार, सध्या वेल्हा, गोवा) असे असून तो बांधकामाच्या ठिकाणी प्लास्टरिंगचे काम करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरबेज सोमवारी दुपारच्या सुमारास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर प्लास्टरिंगचे काम करीत असताना अचानक त्याचा तोल गेला. संतुलन सुटल्याने तो थेट खाली कोसळला.

Goa Death News
Goa Accident Deaths: चिंताजनक! गोव्‍यात 308 दिवसांत तब्‍बल 216 जणांचे बळी; अपघाती मृत्यूंची वाढती संख्या

दुर्दैवाने, त्याच वेळी खाली उभी असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर तो आपटला. या घटनेत तरबेजचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी जखमी झाली असून तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीची प्रकृती आता स्थिर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Goa Death News
Goa Accident Death: भरधाव टँकर येऊन आदळला, कारचा चक्काचूर; दोघाजणांच्या अपघाती मृत्यूमुळे क्रीडाक्षेत्रात हळहळ

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. झुआरीनगर पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरातील बांधकाम कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून प्रश्न उपस्थित होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com