Margao Raia hotmixing road Canva
गोवा

Margao: हॉटमिक्सिंग केलेले रस्ते पुन्हा खणू देणार नाही, त्यापेक्षा पर्यायी व्यवस्था करा; आमदार रेजिनाल्ड यांचा इशारा

Margao Raia hotmixing road: राय परिसरातील रस्त्यांच्या हॉटमिक्सिंगचे काम सुरू करण्यात आले आहे. त्‍यावर सुमारे ३.५ कोटींचा खर्च केला जाणार आहे.

Sameer Panditrao

मडगाव: राय परिसरातील रस्त्यांच्या हॉटमिक्सिंगचे काम सुरू करण्यात आले आहे. त्‍यावर सुमारे ३.५ कोटींचा खर्च केला जाणार आहे. रायमध्ये भूमिगत वाहिन्यांचे काम होणे बाकी आहे. हॉटमिक्सिंग केलेले रस्त्यांचे पुन्हा खोदकाम करू देणार नाही, त्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. याबाबत सर्व खात्यांशी चर्चा केलेली आहे, अशी माहिती आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्‍स यांनी दिली.

राय-कुडतरी येथील रस्‍त्‍याच्‍या हॉटमिक्सिंगच्या कामाची सुरवात आमदार रेजिनाल्ड यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी त्‍यांनी सांगितले की, कुडतरी मतदारसंघातील विविध भागातील रस्त्यांच्या हॉटमिक्सिंगचे काम हाती घेण्यात आलेले आहे. कोणत्याही प्रकारच्या राजकारणाशिवाय कुडतरी मतदारसंघासाठी काम केले जात आहे.

राय परिसरात भूमिगत वाहिन्यांचे काम झालेले नाही मात्र कुडतरी परिसरात झालेले आहे. राय परिसरातील रस्त्यांच्या हॉटमिक्सिंगचे काम करत असताना वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम करण्याकरिता बाजूला पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. दरम्‍यान, कुडतरी मतदारसंघात आत्तापर्यंत ५० ते ६० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे हाती घेतलेली आहेत.

रस्‍त्‍याशेजारी कचरा टाकू नका

कुडतरी मतदारसंघातील रस्त्यांशेजारी टाकण्यात येणारा कचरा पंचायतीकडून उचलण्यात येतो. पण लोक पुन्हा कचरा टाकतात. राज्याबाहेरून आलेल्या व्यक्तींसह काही स्थानिकांकडूनही कचरा टाकण्याचे प्रकार घडतात. पण सुका व ओल्या कचऱ्यासाठी व्यवस्थापन करण्याची गरज असून ती केली जाईल. हा कचरा गुरे खातात व त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे माणसांसह प्राण्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याने कचरा कुणीही रस्त्याशेजारी टाकू नये, असे आवाहन आमदार रेजिनाल्ड यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT