Raia Panchayat MRF : रायमध्ये कचरा प्रश्न ऐरणीवर; कंत्राटदाराची मात्र पंचायतीवरच आगपाखड

राय पंचायतीमध्ये सध्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. राय पंचायतीने एमआरएफ सुविधा उपलब्ध करुन देताना कचरा एकत्रित करण्यासाठी शेड उभारली होती. मात्र तिथे कचरा विल्हेवाट सुविधा उपलब्ध नसल्याने त्या शेडमध्ये कचऱ्याचे ढीग साचल्याचं चित्र आहे.
MRF Facility in Raia Goa
MRF Facility in Raia GoaDainik Gomantak

Raia Panchayat MRF : राय पंचायतीमध्ये सध्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. राय पंचायतीने एमआरएफ सुविधा उपलब्ध करुन देताना कचरा एकत्रित करण्यासाठी शेड उभारली होती. मात्र तिथे कचरा विल्हेवाट सुविधा उपलब्ध नसल्याने त्या शेडमध्ये कचऱ्याचे ढीग साचल्याचं चित्र आहे. इतकंच नाही तर लोक आता एमआरएफ शेडबाहेर कचरा आणून फेकायला लागल्याने सर्वत्र दुर्गंधीचं वातावरण पसरलं आहे. या कचऱ्याची उचलही केली जात नसल्याने स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्नही आता निर्माण झाला आहे. मात्र या सर्व प्रकाराला पंचायतच जबाबदार असल्याचा आरोप संबंधित कंत्राटदाराने केला आहे. हा सर्व प्रकार एका भाजप पदाधिकाऱ्याने समोर आणला होता.

राय पंचायतीमधील कचरा उचलण्याचं काम एका खासगी कंत्राटदाराला देण्यात आलं आहे. तोच या कचऱ्याचं संकलन आणि विल्हेवाट लावण्याचं काम करतो. मात्र गेल्या तीन ते चार महिन्यांपासून राय पंचायतीकडून कंत्राटदाराचं देणं थकल्यामुळे आपण काम थांबवल्याचं म्हटलं आहे. तसंच क्लिंटन वाझ ज्यांच्या व्ही रिसायकल वेस्ट मॅनेजमेंट कंपनीकडे रायमधील कचऱ्याचं व्यवस्थापन आहे, त्यांनी पंचायतीने कचरा संकलनाची निविदा पंचायतीच्या निष्क्रिय कारभारामुळे संपुष्टात आली असल्याचं म्हटलं आहे. पंचायतीकडे वारंवार पत्रव्यवहार करुनही पंचायतीचे सचिव किंवा सरपंच यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचं म्हटलं आहे.

आम्हाला आमचं कचऱ्याच्या संकलनाचं काम मुद्दामहून थांबवावं लागलं आहे, कारण गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पंचायतीने थकीत देणंच दिलं नसल्याचंही कंपनीने म्हटलं आहे. गोव्यातील पंचायत निवडणुकीमुळे पैसे देण्यास विलंब झाल्याचं मान्य आहे, मात्र तीन ते चार महिने वाट पाहणं कठीण असल्याचं सांगत रायमधील कचराप्रश्नी कंत्राटदाराने पंचायतीवरच पलटवार केला आहे. याच कंत्राटदाराकडून दक्षिण गोव्यातील 6 पंचायती आणि 1 महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनाचं काम केलं जातं.

MRF Facility in Raia Goa
MRF Facility in Goa : राय पंचायतीकडून उच्च न्यायालयाची दिशाभूल

राय गाव तुलनेने मोठा असल्याने गावामध्ये पाचवेळा दोन चालकांसह फेरी मारावी लागते. त्यांच्यासोबतच चार कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करावी लागते. चार ते पाच टनांचा सुका कचरा दरमहिन्याला गोळा केला जातो. या कचऱ्यावर एमआरएफ म्हणजेच मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी केंद्रात प्रक्रिया केली जाते. यात पुनर्प्रक्रिया करता न येणारा सुमारे दोन ते तीन टन कचरा साळगावातील प्रक्रिया केंद्रात पाठवला जातो. या सर्व प्रक्रियेसाठी कंत्राटदाराकडून 41 हजार रुपयांचं बिल पंचायतीला दिलं जातं, असं कंत्राटदाराने स्पष्ट केलं आहे. मात्र पंचायतीकडून जवळपास दोन लाखांचं बिल थकल्याने कंत्राटदाराने कचरा न उचलण्याचा पवित्रा घेतला आहे, ज्यामुळे राय पंचायत क्षेत्रात कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com