Goa Investment Fraud Dainik Gomantak
गोवा

Investment Fraud: जादा परताव्याच्या आमिषाने फसवणूक, 20 लाख रुपये उकळले; एकावर गुन्हा दाखल

Goa Investment Fraud: जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून मडगावातील काही नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून मडगावातील काही नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी हितेश कुमार चक्रवती (४२) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

तक्रारदार जीत जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारवाई केली. संशयिताने आपण ‘कास्तीया कॅपिटल प्रायवेट लिमिटेड’ या कंपनीशी संलग्न असल्याचे भासवून संबंधितांची दिशाभूल केली. कंपनीची कागदपत्रे दाखवून जादा परतावा देण्याचे आश्वासन देत त्याने गुंतवणुकीस प्रवृत्त केले.

या आमिषाला बळी पडलेल्या काही गुंतवणूकदारांकडून संशयिताने सुमारे २० लाख रुपये उकळले. त्यानंतर ही रक्कम स्वतःच्या खात्यात वळवून बनावट कागदपत्रांच्या आधारे ती कंपनीत जमा केल्याचे भासवण्यात आले.

फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर जैन यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय वेळीप पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhagwan Mahavir: धुक्यात हरवलेले जंगल, फेसाळणारा दूधसागर आणि वन्यजीवांचा थरार; पावसात नक्की भेट द्या गोव्याच्या 'या' अभयारण्याला

डिचोली बाजारात वीजवाहिन्यांचा धोका; 'स्पार्क'मुळे व्यापारी भयभीत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Goa Sports Complex: कांपाल क्रीडा, व्यापारी सुविधा भाडेपट्टीवर; खासगी संस्थेमार्फत चालविण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Goa Athletics Championship: राज्यस्तरीय ॲथलेटिक्सला मोठा प्रतिसाद; मनोहर पर्रीकर स्मृती स्पर्धेत 2 हजार ॲथलीट्सचा सहभाग अपेक्षित

VIDEO: शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची एन्ट्री; पाकिस्तानचा खरा चेहरा उघड! व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT