Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

Torse Pernem Elephant Attack: कडशी मोपा परिसरात वावरत असलेल्या ओंकार हत्तीची पावले तोरसेकडे वळली आहेत. तोरसेतील शत्रुघ्न महादेव परब यांच्या बागायतीतील कवाथ्यांचे या हत्तीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
Torse Pernem Elephant Attack:
Omkar Elephant GoaDainik Gomnatak
Published on
Updated on

मोरजी: कडशी मोपा परिसरात वावरत असलेल्या ओंकार हत्तीची पावले तोरसेकडे वळली आहेत. तोरसेतील शत्रुघ्न महादेव परब यांच्या बागायतीतील कवाथ्यांचे या हत्तीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. दरम्यान, या हत्तीचा बंदोबस्त करण्यास वन विभाग अपयशी ठरला असून सरकारही याबाबत गंभीर नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

ओंकार हत्ती तोरसे परिसरात पोहोचल्याने येथील शेतकरी धास्तावले आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात मिरची, अळसांदे, भुईमूग, मका, नाचणी तसेच भात अशी पिके घेतली जातात. ओंकारच्या आगमनामुळे ही पिके धोक्यात आली आहेत. या हत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Torse Pernem Elephant Attack:
Omkar elephant Goa: तांबोसेतील मळ्यात 'ओंकार हत्ती'चे बस्तान! बागायतीचे नुकसान सुरूच; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

शेतकरी धास्तावले

याबाबत स्थानिक पंच रमेश बुटे यांनी सांगितले की, ओंकार हत्तीवर वनरक्षक पाळत ठेवून आहेत. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी वन अधिकाऱ्यांना या हत्तीचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. शेती-बागायतींचे नुकसान होत असल्याने येथील शेतकरी धास्तावले आहेत. त्यामुळे त्वरित या हत्तीचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. तोरसे भागातून हा हत्ती तांबोसे परिसरात घुसण्याची शक्यता आहे. तांबोसे परिसरात मोठ्या प्रमाणात शेतमळे असल्याने मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सरकारने तातडीने या हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी चेतन सावंत यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com