Court Order, summons  Canva
गोवा

Goa Crime: 'मुले तुझी आठवण काढत आहेत' सांगून घरी बोलावले, युवतीला दिला पेढा; लैंगिक अत्याचारप्रकरणी महिलेसह एकावर आरोप निश्चित

Goa Crime News: सकृतदर्शनी पुरावा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनाला आल्यानंतर न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयातील अनेक निर्णयांचा दाखला देत संशयित आरोपीविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला.

Sameer Panditrao

मडगाव: कटकारस्थान रचून एका युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात रेईसा चोपदार या महिला संशयितेसह कासिम हुलेगुर याच्याविरुद्ध सकृतदर्शनी पुरावा असल्याने त्यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा आदेश मडगावच्या सत्र न्यायालयाने मंगळवारी दिला.

न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार संशयित आरोपी रेईसा चोपदार हिने फोन करून या प्रकरणातील पीडित युवतीला माझी मुले तुझी आठवण काढत आहेत, असे सांगून आपल्या घरी बोलावले होते. त्यानंतर रेईसा ही त्या पीडित युवतीला कुडचडे येथील आपल्या घरी घेऊन गेली.

तिथे संशयित आरोपी कासिम हुलेगुर आधीच थांबलेला होता. संशयित आरोपी रेईसा हिने पीडित युवतीला पेढा दिला आणि पाणी दिले. त्यानंतर ती युवती गुंगीमध्ये गेली. त्या अवस्थेचा गैरफायदा घेत आरोपी कासिमने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, असा गंभीर आरोप पीडित युवतीने केला.

हे प्रकरण सुनावणीस आले तेव्हा आरोप निश्चित करण्याची वेळ होती. या प्रकरणात सकृतदर्शनी पुरावा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनाला आल्यानंतर न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयातील अनेक निर्णयांचा दाखला देत संशयित आरोपीविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला आणि या प्रकरणातून संशयितांना मुक्त करण्यासाठी सादर केलेला डिस्चार्ज अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

खटला सुरू राहणार

संशयित आरोपी कासिम हुलेगुर आणि रेईसा चोपदार यांच्याविरुद्ध लैंगिक खटला सुरू राहणार असल्याचे सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश शॅरीन पॉल यांच्या न्यायालयाने आदेशात म्हटलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT