Goa Crime: सरकारी अधिकाऱ्यावर केला जीवघेणा हल्ला, लंडनला गेला पळून; वर्षभराने संशयिताला कलकत्त्यात अटक

Government Officer Attack Case: गेल्या वर्षी मार्च महिन्यात मडगाव येथे एका सरकारी अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करुन लंडनला पळालेला संशयित अखेर पोलिसांच्या हाती लागला.
Government Officer Attack Case
ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

Government Officer Attack Case: गेल्या वर्षी मार्च महिन्यात मडगाव येथे एका सरकारी अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करुन लंडनला पळालेला संशयित अखेर पोलिसांच्या हाती लागला. तब्बल एक वर्ष फरार राहिल्यानंतर या आरोपीला कलकत्ता आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. रॉडनी सॅव्हियो अल्विन गोम्स (वय वर्ष 37) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तो मूळचा फातोर्डा येथील आंबजी भागातील रहिवासी आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या तपासकार्याला एक मोठे यश मिळाले आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

दरम्यान, हे प्रकरण गेल्या वर्षी (2024) मार्च महिन्यातील आहे. फातोर्डा येथील गोम्सने मडगाव येथे एका सरकारी अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला होता. हल्ला केल्यानंतर तो लगेचच फरार झाला. पोलिसांनी तात्काळ त्याचा शोध सुरु केला. मात्र, पोलिसांना चकमा देऊन तो देशाबाहेर पळून जाण्यात यशस्वी झाला आणि लंडनमध्ये (London) लपून बसला होता. पोलिसांचा सुरुवातीचा तपास निष्फळ ठरला, परंतु त्यांनी आरोपीला पकडण्यासाठी आपला पाठलाग सुरुच ठेवला.

Government Officer Attack Case
Goa Crime: बायणात महिलेचा गळा चिरून खून, कारण अस्‍पष्‍ट; घटनेनंतर खुनी तेथेच बसला होता आरामात

गुन्हा दाखल झाल्यानंतर गोवा पोलिसांनी (Goa Police) आरोपीला पकडण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला. आरोपीने देशात परत येण्याचा प्रयत्न केल्यास तात्काळ पकडला जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली. पोलिसांची हीच रणनीती यशस्वी ठरली.

अखेर कलकत्त्यात पकडला

एक वर्ष लंडनमध्ये लपून बसल्यानंतर आरोपी गोम्सने पुन्हा भारतात परतण्याचा निर्णय घेतला. तो कलकत्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला. विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याचा पासपोर्ट तपासला असता, त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले आणि गोवा पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच मडगाव पोलिसांचे एक विशेष पथक तातडीने कलकत्ताकडे रवाना झाले. त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन आरोपीचा ताबा घेतला. आता आरोपी गोम्सला घेऊन पोलीस पथक लवकरच गोव्याला परतणार आहे.

Government Officer Attack Case
Goa Crime: 1 जानेवारी पासून 20 खून, 15 खुनाचे प्रयत्‍न; गोव्‍याचे बिहार झाल्‍याचा विरोधकांकडून आरोप..

आता पुढील तपास सुरु

आता त्याला मडगावामध्ये आणल्यानंतर त्याची न्यायालयात हजर करण्यात येईल. न्यायालयाने दिलेल्या पोलीस कोठडीदरम्यान पोलिस त्याची कसून चौकशी करतील. या हल्ल्यामागे नेमके काय कारण होते, आरोपीचा हेतू काय होता, आणि या हल्ल्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता केला जाईल. तब्बल वर्षभरानंतर झालेली ही अटक मडगाव पोलिसांसाठी एक मोठे यश मानले जात आहे, ज्यामुळे या प्रकरणातील सत्य आता समोर येईल अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com