मडगाव: मडगावातील पिंपळकट्ट्याजवळ असलेल्या एका जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सज्जाचा अर्धा स्लॅब कोसळण्याची दुर्घटना आज शुक्रवारी दुपारी १ वा.च्या दरम्यान घडली. हा स्लॅब कोसळून तीन वाहनांचे नुकसान झाले. मात्र, त्यावेळी या इमारतीच्या खाली कुणीच नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.
या इमारतीच्या खाली एका कारमध्ये एक मुलगा बसून होता. त्याची आई छत्री दुरुस्तीसाठी गेली होती. देवाच्या कृपेने यात हा मुलगा बालबाल बचावला. पाऊस असल्याने या भागात रहदारीही कमी होती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यापूर्वीही या इमारतीत अशी घटना घडली होती.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार दिगंबर कामत यांनी घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह भेट देऊन ही इमारत सील करण्यात येणार असल्याचे सांगितले.
आपण याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे बोललो आहे, ते याबाबत आदेश आजच जारी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
देव दामोदराच्या कृपेने मोठा अनर्थ टळला, असे सामाजिक कार्यकर्ते सचिन सातार्डेकर म्हणाले. तर ही घटना घडताना बघितलेल्या अंती या महिलेने हा स्लॅब हळूहळू कोसळला. या इमारतीच्या खाली अनेक हमाल राहात असल्याचे सांगितले. मात्र, सुदैवाने त्यावेळी तिथे कुणीच नव्हते.
आजच्या या दुर्घटनेमुळे मडगाव शहरातील जीर्ण इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मडगावात अनेक जीर्ण इमारती आहेत. एका पाहणीनुसार त्यांची संख्या १७ एवढी आहे.
या इमारती धोकादायक असूनही, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी आता लोकांकडून होत आहे.
जे आहे ते सध्याच्या स्थितीत हटविण्यात येईल, त्यासाठी ब्रेकर व कटरची गरज असून, आपण कंत्राटदार संतोष जॉर्ज व अग्निशामक दलाकडे बोललो आहे. ही इमारत खासगी आहे. या इमारतीत कुणाचे साहित्य असेल तर त्यांना ते घेऊन जाण्यास सांगितले आहे. सध्या या भागातील वाहतूक बंद केली असून, वाहने पार्क करण्यास मनाई केली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे आम्ही या इमारतीसंबंधी बोलणार आहोत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.