Margao: कोंब-मडगाव येथे रेल्वेफाटकापाशी होतेय गर्दी! अतिक्रमणे वाढली; उड्डाणपुलाची होतेय मागणी

Margao Comba Flyover: कोंब-मडगाव येथे रेल्वेफाटकामुळे नागरिकांना, विद्यार्थ्यांना भयंकर त्रास सोसावा लागत आहे. या परिसरात शाळा, उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय आहे.
Comba Margao railway gate problem
Comba Margao railway gate problemDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: कोंब-मडगाव येथे रेल्वेफाटकामुळे नागरिकांना, विद्यार्थ्यांना भयंकर त्रास सोसावा लागत आहे. या परिसरात शाळा, उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय आहे. त्‍यामुळे हजारो विद्यार्थी या मार्गावरून येजा करतात. रेल्वे रस्त्याखालून भुयारी मार्ग आहे व पावसात तिथे पाणी भरते. तेथून जाता येत नाही. त्यामुळे लोक आता उड्डाणपुलाची मागणी करू लागले आहेत.

रेल्वेफाटकाच्या बाजूलाच सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्तारुंदीकरणासाठी संपादन केलेल्या जागेत बेकायदेशीर गाडे उभारण्यात आल्याने वाहनचालकांना, पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गाड्यांमुळे फाटक मार्गावरून येणारी पश्र्चिम बगलरस्त्यावरील वाहने दिसत नसल्याने लहान-मोठे अपघात होतच असतात.

हे गाडे हटविण्यासाठी नगरपालिकेकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र पालिकेचे त्‍याकडे दुर्लक्षच झाले आहे. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी या रेल्वेफाटकावरून उड्डाणपूल बांधला जाईल व त्यासंदर्भात कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे सांगितले होते. शिवाय पश्र्चिम बगलमार्गावरील ला फ्लोर ते जुने रेल्वे स्टेशन येथेसुद्धा उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे. मात्र रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हा प्रस्ताव राज्य सरकारकडून आला पाहिजे.

Comba Margao railway gate problem
Porvorim Flyover: पर्वरीत उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला! "सुरक्षेची खात्री देणार की बळी जाण्याची वाट बघणार"? अमरनाथ पणजीकरांचा सरकारला सवाल

अतिक्रमणाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय

उच्च न्यायालयाने रस्त्यावरील बेकायदा गाडे हटविण्याचा आदेश दिला आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा मुख्याधिकाऱ्याला यासंदर्भात कारवाई करण्यास सांगितले आहे. मात्र अजून नगरपालिकेतर्फे काही हालचाल केलेली दिसत नाही असे लोकांचे म्हणणे आहे. सध्‍या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाने रस्त्यावरील अतिक्रमणाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते. त्यासंदर्भात रस्त्यावरील व्यापारी गाड्यांना नगरपालिकेने परवानगी दिली आहे का याबद्दल विचारणा केली आहे, मात्र नगरपालिकेकडून काहीही उत्तर आले नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Comba Margao railway gate problem
Margao Crime: मित्राला स्टेशनवर सोडले, झुडुपात बसलेल्या चौघांनी केला हल्ला; मोबाईल आणि रोख रक्कम पसार, संशयितांना अटक

नगरपालिकेचे सातत्‍याने दुर्लक्ष

कोंब येथील रस्ता अतिक्रमणाबद्दल सार्वजनिक बांधकाम खात्याने जानेवारी २०२४ साली मडगाव नगरपालिकेला पत्र लिहिले होते. नंतर ५ एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या साहाय्यक अभियंत्याने नगरपालिकेला स्मरणपत्र पाठविले. तरीही पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे कळते. आता ही अतिक्रमणे कोण हटविणार? सार्वजनिक बांधकाम खाते की मडगाव नगरपालिका? हा प्रश्‍‍न नागरिकांना पडलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com