Unsafe Buildings margao  Dainik Gomantak
गोवा

Unsafe Buildings : मडगावात 23 असुरक्षित इमारती; तातडीने पाडण्याची मागणी

Unsafe Buildings : जुन्या पालिका इमारतीचाही समावेश

गोमन्तक डिजिटल टीम

Unsafe Buildings : सासष्टी, मडगाव शहरात असुरक्षित इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेस आला आहे. काही इमारती मुख्य रस्त्यावर असल्याने त्या कोसळल्या तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही या इमारती न पाडता पालिका या इमारतींत धंदा व्यवसायासाठी व्यापारी परवाने देत असल्याने चिंतेत भर पडली आहे.

या संदर्भात शेडो कौन्सिलचे निमंत्रक व कॉंग्रेसचे नेते सावियो कुतिन्हो यांनी सांगितले की, मडगावात २३ असुरक्षित इमारती अशा आहेत ज्या तातडीने पाडणे गरजेचे आहे. असुरक्षित इमारतींचा प्रश्न २०१२ पासून रखडला आहे.

तेव्हा असुरक्षित इमारतींची यादी तयार करण्यात आली होती, त्यात जुन्या बाजारातील जुन्या नगरपालिका इमारतीचाही समावेश होता असे कुतिन्हो यांनी सांगितले.

मडगावमधील एक इमारती २०१८ साली असुरक्षित घोषित केल्यावर तिथे राहणाऱ्यांना जागा रिकामी करण्यास सांगितले होते. त्यांनी ती जागा सोडलीही होती. मात्र नंतर तळमजल्यावर पालिकेने पॅरागॉन चप्पलाच्या शोरूमला परवानगी दिली, तेव्हा सोडून गेलेले रहिवासी चाळवले व त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

मुख्याधिकाऱ्यांनी देखील थेट ही इमारत न पाडता व्यापाऱ्याला कारणे दाखवा नोटीस पाठवली व सुनावणी १४ डिसेंबरला निश्र्चित केली, जी कधी झालीच नाही असेही कुतिन्हो यांनी सांगितले.

बिल्डरला रस असतो तेव्हा परवानगी...

काही इमारती अशा आहेत ज्यांचा काही भाग असुरक्षित आहे. त्यावरही उपाययोजना आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या बिल्डरला रस असतो किंवा तो तिथे नवीन इमारत उभारण्याचा ठरवितो तेव्हा ती पाडण्यासाठी परवानगी दिली जाते.

ज्यामुळे त्या बिल्डरला त्यात कोट्यवधी रुपयांचा फायदा होतो, असेही कुतिन्हो यांनी स्पष्ट केले.

काही इमारती १०० वर्षांपूर्वीच्या

येथील नागरिक दिनेश काकोडकर म्हणाले की, मडगावात कमीत कमी २० तरी अशा इमारती आहेत, ज्या १०० वर्षांपेक्षा जास्त पूर्वीच्या आहेत. भर बाजारातील लोटलीकर इमारत, सिंडिकेट हॉटेल होती ती इमारत, ला फ्लोर हॉटेल जवळील इमारत, रेमंड शोरूम शेजारील इमारत या सर्व तातडीने पाडणे गरजेचे आहे.

या इमारती केव्हा तरी कोसळतील हे स्पष्ट दिसत आहे. पालिकेची स्वतःची इमारती, न्यू मार्केटमधील पालिकेची इमारती, कोमुनिदाद इमारतीचाही यात समावेश होतो, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT