Goa Accident: गोव्यात नववर्षाच्या प्रारंभीच अपघातात 4 जण ठार; स्मार्टसिटीच्या कामात एकाचा मृत्यू

मळा, ताळगाव व भोमा येथे स्वयं अपघातात तर वाळपईत वाहनांच्या टक्करीत चालकांचा मृत्यू
Panaji Accident
Panaji Accident Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident: नववर्ष प्रारंभी राज्यात पुन्हा अपघातांचे मृत्यूसत्र सुरू झाले आहे. काल (रविवारी) रात्री उशिरा व आज (सोमवारी) पहाटे झालेल्या चार अपघातात चौघांचा बळी गेला आहे. मळा, ताळगाव व भोमा येथे स्वयं अपघात होऊन तर वाळपई येथे वाहनांमध्ये झालेल्या टक्करीत चालकांचा मृत्यू झाला आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत पणजीत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांच्या बेजबाबदारपणामुळे मळा येथील एका तरुणाला जीव गमावावा लागला आहे. स्मार्टसिटी अंतर्गत कामावेळी झालेला हा तिसरा बळी आहे.

अपघातामुळे स्मार्ट सिटीच्या कामांबाबत लोकांना व वाहन चालकांना होत असलेले त्रास याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्यावर्षी रस्ता अपघातांचे प्रमाण कमी असले तरी अपघातातील मृत्यूची संख्या तिनशेच्या आसपास पोहचली आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या अपघातांमुळे हे नवीन वर्ष वाहन चालकांसाठी कर्दनकाळ ठरले आहे.

पणजीत स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या मळा येथील मलनिस्सारण कामाच्या ठिकाणी आज पहाटेच्या सुमारास रायबंदर येथील आयुष रुपेश हळर्णकर या दुचाकीसह खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू झाला. याचे खापर लोकांनी कंत्राटदारावर फोडले असले तरी कंत्राटदारांनी तो दावा फेटाळून लावला आहे.

Panaji Accident
Goa Gold Smuggling: गोवा पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राज्यातील विमानतळांवरील सोने तस्करीत हात
Taleigao and Valpoi Accident
Taleigao and Valpoi Accident Dainik Gomantak

कामाच्या ठिकाणी आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या, असे कामाच्या पर्यवेक्षक तथा सहाय्यक अभियंता रश्‍मी शिरोडकर यांनी दावा केला आहे. ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्यावेळी तेथील रस्त्यावरील वीजपुरवठा बंद होता.

त्यामुळे वाहन चालकांना तेथून जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागत होते, अशी माहिती समोर आली आहे. ताळगाव येथे दुसऱ्या अपघातात जिप्पी भगत या 22 वर्षीय तरुणाचा स्वयं अफघाताने मृत्यू झाला. जखमी अवस्थेत त्याला गोमेकॉत नेण्यात आले पण वाटेतच मृत्यू झाला.

मुस्लिमवाडा भोमा येथे रात्री स्कुटरची वीज खांबाला धडकल्याने झालेल्या अपघातात प्रतिम रोमन बोरा (31, मुस्लिमवाडा, मूळ आसाम) याचा त्याच्या काल (31 डिसेंबर) वाढदिनादिवशीच मृत्यू झाला. म्हार्दोळ पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.

वाळपई येथे हनुमान मंदिराजवळ कार व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात पोलिस कॉन्स्टेबल उल्हास गावकर (32, डोंगुर्ली-ठाणे) गंभीर जखमी झाला. त्याला गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी नेण्‍यात आले मात्र काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.

तो फोंडा पोलिस स्थानकात कार्यरत होता. आज पहाटे सोमवारी ड्युटीवर जाण्यासाठी तो दुचाकीने फोंडा येथे जात होता तर कार ठाणेच्या दिशेने जात होती.

Panaji Accident
Goa State Debt: गोव्याचे कर्ज 35 हजार कोटींवर; राज्यातील प्रत्येक नागरीकावर 2.2 लाख रुपयांचा बोजा
Bhoma accident
Bhoma accidentDainik Gomantak

खड्ड्यात पडून मृत्यू

माजी नगरसेवक रुपेश हळर्णकर यांचा मुलगा आयुष हा खड्ड्यात पडून मृत्यू पावल्याची माहिती मिळताच पणजीचे स्थानिक आमदार व मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी त्वरित कामाच्या पर्यवेशक तथा अभियंता रश्‍मी शिरोडकर यांना पाचारण करून या अपघातासंदर्भात माहिती घेतली.

तेथे अनेक दिवसांपासून पथदीप लागत नसल्याचे तसेच रिफ्लेक्टर लावण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले.

आत्तापर्यंत तिघाचा बळी!

स्मार्ट सिटी अंतर्गत पणजी शहरात सुरू असलेल्या कामांवेळी आतापर्यंत तिघांचा बळी गेला आहे. सांतिनेझ येथील बुजवलेल्या खड्ड्यामध्ये चिऱ्यांचा ट्रक खचल्याने एका कामगाराच्या त्याच्यावर चित्र्यांचा ढीग पडल्याने मृत्यू झाला होता.

रायबंदर येथे खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये काम करत असलेल्या एका कामगारावर मातीचा ढिगारा कोसळून तो आतमध्ये गुदमरून मृत्यू झाला होता. तिसरा बळी मळा येथे खड्ड्यात दुचाकीसह पडून एका तरुणाचा झाला आहे.

त्यामुळे हे काम पूर्ण होईपर्यंत आणखी कितीजणांचा बळी जाणार आहेत, असा संतप्त प्रश्‍न लोक करू लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com