Margao Municipality Dainik Gomantak
गोवा

मुरगाव नगरपालिका प्रशासनाचे नूतन मार्केटमध्ये तात्पुरते होणार स्थलांतर

मात्र इमारतीत मुरगाव नगरपालिकेचे (Margao Municipality) संपूर्ण प्रशासन असून यात मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, लेखा अधिकारी, पालिका निरीक्षक, अभियंता, घरपट्टी कार्यालय आहे.

दैनिक गोमन्तक

मुरगाव नगरपालिका (Murgaon Municipality) इमारतीच्या नूतनीकरणाचे काम पालिकेचे प्रशासकीय कार्यालये खुली असल्याने नूतनीकरणाच्या कामाला अडथळा निर्माण होत असल्याने संपूर्ण मुरगाव नगरपालिकेच्या प्रशासनाचे स्थलांतर मुरगाव सडा येथील राज्य नगरविकास संस्थाच्या नूतन मार्केटमध्ये तात्पुरते स्थलांतर चतुर्थी नंतर करण्यात येईल.

राज्य नगरविकास विभागाच्या (State Urban Development Department) राज्य नगर विकास संस्था (सुडा) मार्फत वास्को येथील अ दर्जाची मुरगाव नगरपालिकेचे नूतनीकरणाचे काम गेले दीड वर्षापासून सुरु आहे. मात्र इमारतीत मुरगाव नगरपालिकेचे संपूर्ण प्रशासन असून यात मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, लेखा अधिकारी, पालिका निरीक्षक, अभियंता, घरपट्टी कार्यालय आहे. यामुळे सूडाच्या कंत्राटदाराला पाहिजे त्याप्रमाणे इमारतीचे काम करण्यास मोकळीक मिळत नाही.

तसेच पालिकेच्या इमारतीत महसूल विभागाची उपजिल्हाधिकारी, मामलेदार कार्यालय, नागरी पुरवठा कार्यालय असल्याने याचा सुद्धा इमारतीचे काम करताना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. कदाचित यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सध्यातरी मुरगाव नगरपालिकेचे पूर्ण प्रशासकीय कार्यालय सडा येथील सूडाच्या मार्केट प्रकल्पात तात्पुरते स्थलांतर करण्याचे योजिले आहे. चतुर्थीनंतर वास्कोतील पूर्ण पालिकेचे स्थलांतर सडा येथे करण्यात आल्यानंतर पालिकेच्या इमारतीत असलेल्या इतर कार्यालयांना सुद्धा दुसऱ्या ठिकाणी कार्यालयाचे स्थलांतर करावे लागणार अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली.

मुरगाव नगरपालिकेच्या पहिल्या मजल्यावरील मुनिसिपल स्कूलचे नुतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या कोरोना महामारी (Covid 19) असल्याने सर्व विद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. मुनिसिपल स्कूलचे सर्व वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्यात आले आहे. तसेच पालिकेच्या पहिल्या मजल्यावरील जनता वाचनालय सभागृहाचे सुद्धा स्थलांतर करण्यासाठी गेल्या आठवड्यात वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांसोबत पालिका अधिकाऱ्यांची बैठक झाली होती.

मुरगाव नगरपालिका इमारतीचे नूतनीकरणाचे काम व्हायला पाहिजे तर सर्वप्रथम येथील सर्व कार्यालये येथून हलवणे अत्यंत गरजेचे असल्याची माहिती पालिकेचे नूतनीकरण करणाऱ्या सूडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार मुरगाव नगरपालिकेचे येणारा मुख्य दरवाजा नूतनीकरणासाठी बंद करण्यात येणार आहे. सध्या पालिकेच्या इमारतीचे नूतनीकरणाचे काम ३० टक्के झाल्याने सुडाच्या कंत्राटदारांना पालिकेचे काम लवकर करण्यासाठी सहकार्य करण्याचे पालिकेने ठरवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Snehal Kavathankar: गोवा क्रिकेटसाठी मोठी बातमी! कर्णधार 'स्नेहल'ला प्रतिष्ठेचा सन्मान; BCCI च्या पुरस्काराचा होणार मानकरी

Rahul Dravid: 'राहुल द्रविड'चा BCCI करणार गौरव? लवकरच होणार घोषणा; शुभमन, मिताली राजचीही नावे पुढे

अग्रलेख: राज्यात किडनी विकाराने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याचे वास्तव; संशोधन, तपासणी मोहिमेची गरज

Goa Temperature: गोमंतकीयांनो काळजी घ्या! उन्हाचा तडाखा वाढला; येत्या दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता

Deposit Refund Scheme: स्वच्छ गोव्यासाठी ‘डीआरएस’ योजना गरजेची! CM सावंतांनी मांडली योजना; दरवर्षी कचऱ्यावर 600 कोटींचा खर्च

SCROLL FOR NEXT