Goa: मुरगाव नगरपालिका क्षेत्रात दूषित पाण्याचे साम्राज्य !

मुरगाव नगरपालिका क्षेत्रात (Murgaon Municipal Area) असलेले दाबोळी भागातील वाडे येथील तळ्याचे पाणी दूषित होऊ लागले आहे.
Murgaon Municipal Area
Murgaon Municipal AreaDainik Gomantak
Published on
Updated on

मुरगाव नगरपालिका क्षेत्रात (Murgaon Municipal Area) असलेले दाबोळी भागातील वाडे येथील तळ्याचे पाणी दूषित होऊ लागले आहे. संपूर्ण वाडे तळ्यात बुरशीचे थर निर्माण झाल्याने तळ्यातील जैव वैविधता नष्ट होऊ लागली आहे. तळ्या सभोवती दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.मुरगाव नगरपालिकेने सदर तळ्याचा ताबा घेऊन तळ्याची देखभाल करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

राज्य नगरविकास संस्था (सुडा) तर्फे दाबोळी वाडे तळ्याचे सुशोभीकरण दोन टप्प्यातून करण्यात आले होते. तसेच संपूर्ण तळ्या सभोवती येथे येणाऱ्या नागरिकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिलेले आहे. मात्र तळ्यातील पाणी गेल्या काही महिन्यापासून दुषित होऊन तेथे बुरशीचे थर ( शेळा) मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचे सौंदर्य लुप्त होऊ लागले आहे. वास्को, नवेवाडे, वाडे, दाबोळी परिसरातील हिंदू भाविक याच तळ्यात गणेश चतुर्थीत गणेश विसर्जन करतात. गेल्या काही महिन्यापासून तळ्यातील पाण्यात बुरशीचे थर पैदास झाल्याने या तळ्यातील जैव वैविधता नष्ट होत चालली आहे.

Murgaon Municipal Area
Goa Politics: "राज्याचा प्रवास विकासाऐवजी विनाशाकडे"

तर सकाळ संध्याकाळच्या सत्रात चालण्यासाठी येणार्‍याना सध्या तळ्यात निर्माण झालेल्या शेळ्यामुळे दुर्गंधीला सामोरे जावे जावे लागत आहे. तसेच तळ्यात आजूबाजूच्या परिसरातील सांडपाणी सुद्धा येत असल्याची तक्रार मुरगाव नगरपालिकेत अनेक वेळा करण्यात आलेली आहे. मुख्य म्हणजे सुडा मार्फत तळ्याचे सौंदर्यीकरण करण्यापूर्वी तळ्याचे पाणी वाडे येथील नाल्यातून समुद्रात जात होते. तसेच समुद्रात भरती सुकती वेळी तळ्यातील पाणी समुद्रात ये-जा होत होते.

Murgaon Municipal Area
Goa: इंधन दराचा भडका सुरूच

परंतु राज्य नगरविकास संस्थेमार्फत तळ्याचे सौंदर्यीकरण करताना समुद्रात पाणी जाणाऱ्या तळ्यातील नाल्याची रुंदी कमी करण्यात आल्याने तळ्यातील पाणी समुद्रात ये-जा योग्य रिता होत नसल्याने तळ्यात पूर्णपणे बुरशी निर्माण झाली आहे. यासाठी सुडाने किंवा मुरगाव नगरपालिकेने गणेश चतुर्थी पूर्वी संपूर्ण तळ्यातील बुरशीचे थर काढण्यासाठी त्वरित उचित पावले उचलणे गरजेचे आहे. संबंधित दोन्ही विभागाने तळ्यातील बुरशी काढण्यासाठी राज्य जलसोत्र विभागाकडे संपर्क करणे गरजेचे आहे.

दरम्यान वास्कोतील वाडे तलाव मुरगांव नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात यावे, कोणत्याही खाजगी संस्थेकडे नको, असे स्पष्ट मत गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी व्यक्त केले आहे. वाडे तलाव ही वास्तविक कोणाची खाजगी मालमत्ता नाही. पाण्याचा तलाव हा 'वॉटर बॉडी' अखत्यारित येतो. गेली कितीतरी वर्षे या तलावात या भागातील नवेवाडे, वाडे, शहर परिसर या विभागातील गणपतींचे विसर्जन करण्यात येते.

Murgaon Municipal Area
Goa: काणकोणात लाडली लक्ष्मी योजनेतंर्गत 1कोटी 74 लाखाची समंती पत्रे वितरीत

मध्यंतरीच्या काळात या ठिकाणी सेंट ऍन्ड्रूज चर्चच्या ताब्यात असलेले महाविद्यालय येथे स्थलांतर करण्यात आले. आता ही संस्था तलाव आपल्या ताब्यात देण्यात यावा, अशी मागणी करत आहे. हा तलाव आपल्या ताब्यात आला तर त्याचा उपयोग संस्था आपल्या पद्धतीने उपयोग करेल. न जाणे उद्या तलावात गणपती विसर्जन करण्यास विरोध करण्यात येऊ शकतो, असे नितीन फळदेसाई यांनी मत व्यक्त केले आहे.

Murgaon Municipal Area
Goa: व्याघ्रहत्या रोखण्यासाठी वनखातं करतंय तरी काय ?

तसेच आता पर्यंत या तलावाच्या सुशोभीकरण करण्यासाठी सुडाचा म्हणजेच जनतेचा पैसा प्रत्यक्षात वापरण्यात आला आहे. मग आत्ता तलाव खाजगी संस्थेकडे देण्यासाठी धडपड का होत आहे, हे न कळण्यासारखे आहे, असे फळदेसाई म्हणाले. मुळात या तलावाची समुद्रातील भरती - ओहोटीशी संबंध होता. समुद्राच्या वेळे प्रमाणे या तलावात ही भरती ओहोटी यायची. पण सुशोभीकरण करताना समुद्राशी असलेली नाळच तोडल्याने आता भरती ओहोटी प्रक्रिया होतच नाही. त्यामुळे आत मधील पाणी कुजून तलावा शेजारील लोकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न निर्माण झाला आहे.आरोग्य खाते या कडे लक्ष देणार की नाही? या सर्व गोष्टी पुर्वापार जसे सूरू होते, तसे राहाण्यासाठी तलावाच ताबा खासगी संस्थेकडे न जाता तो मुरगांव नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात यावा, अशी मागणी फळदेसाई यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com