मडगाव नगरपालिका ‘एक शहर, एक ॲप’ उपक्रम राबविणार

ॲप विकसीत करण्याचे काम मडगाव पालिकेने मुंबईतील एका आयटी कंपनीकडे सोपविले आहे
मडगाव: एक शहर, एक ॲप
मडगाव: एक शहर, एक ॲपDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : मडगाव नगरपालिकेने ‘एक शहर, एक ॲप’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या ठिकाणी नगरपालिकेच्या कारभाराची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नगरपालिका कार्यालयात हेलपाटेही घालावे लागणार नाहीत.(Margao Municipality will implement One City, One App initiative)

गेल्या आठवड्यात झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला औपचारिक मान्यताही मिळालेली आहे. ‘एक शहर, एक ॲप’ ही संकल्पना राबविली, तर अशा केंद्रांची गरज भासणार नाही. उलट लोकांना घरबसल्या माहिती उपलब्ध होईल, असा मुद्दा घनश्याम व दामोदर शिरोडकर यांनी मांडला व त्यातून केंद्रांचा प्रस्ताव बारगळला होता.

मडगाव: एक शहर, एक ॲप
Goa: बस्स...यापुढे कोडार खांडेपार नदीच्या पात्रात दुर्घटना नकोच!

काय होणार फायदा

ॲप विकसीत करण्याचे काम पालिकेने मुंबईतील एका आयटी कंपनीकडे सोपविलेले असून ते पूर्ण होताच नगरसेवक व इतरांसाठी त्याचे सादरीकरण केले जाईल. एका क्लिकवर पालिकेबाबतची सर्व माहिती त्यातून उपलब्ध होईल. घरपट्टी, विविध कर, शुल्क याची माहितीही ॲप डाऊनलोड केलेल्या व्यक्तीला मिळेल. त्याचप्रमाणे कुठेही न उचलता राहून गेलेला कचरा आढळला व त्याचे छायाचित्र ॲपवर अपलोड केले तर तो कचराही उचलण्याच्या सूचना संबंधितांना मिळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com