सुका कचरा  Dainik Gomantak
गोवा

सुका कचरा साळगाव प्रकल्पामध्ये हलवावा: मडगाव नगरपालिका

मडगाव पालिका: प्रदूषण नियंत्रण मंडळाला साकडे

दैनिक गोमन्तक

मडगाव: शुक्रवारच्या आग दुर्घटनेमुळे सोनसोडोवरील बेलिंग मशीन व विद्युतीय व्यवस्था नष्ट झाल्याने मडगाव नगरपालिकेने आता गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाचे दरवाजे ठोठावून व्यापारी राजधानीतील सुका कचरा तूर्त साळगाव येथील प्रकल्पामध्ये हलवावा, अशी विनंती केली आहे.

याच प्रयत्नात पालिकेने आणखी एक पत्र गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळालाही पाठवून या सुका कचरा स्थलांतरासाठी ना हरकत दाखला देण्याची विनंती केली आहे. दररोज दहा टन कचरा उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. पालिका मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी ही पत्रे महामंडळ व प्रदूषण मंडळाच्या सदस्य सचिवांना पाठविली आहेत.

शुक्रवारच्या दुर्घटनेचा तपशील देऊन वीज खात्याच्या उच्च दाबाची तार तुटून शॉर्ट सर्किट होऊन आगीचा हा भडका उडाल्याचे म्हटले आहे.

40 लाखांची मालमत्ता भस्मसात

या घटनेमुळे पालिका मंडळाला सोनसोडोवरील बेलिंग मशीन व वीज व्यवस्था खाक झाल्याने तेथे बेलिंग करणे शक्य नाही. त्यामुळे तात्पुरता हा कचरा साळगाव प्रकल्पामध्ये न्यावा, असे म्हटले आहे. फर्नांडिस यांनी सांगितले की, प्राथमिक अहवालानुसार या आगीत सुमारे ४० लाखांची मालमत्ता नष्ट झाली आहे. त्यामुळे तूर्त बेलिंग करणे अशक्य आहे. वीजपुरवठा व सर्व काही सुरळीत व्हायला किमान महिना लागेल, असे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

SCROLL FOR NEXT