drunk beggars creating nuisance in Margao Dainiak Gomantak
गोवा

Margao Merchant Association: मडगावात पिंपळकट्ट्यावर भिकाऱ्यांचा उच्छाद, दारु पिऊन धिंगाणा; न्यू मार्केट व्यापारी संघटनेचा संताप

Gopal Naik Margao Merchants: गांधी मार्केट मधील व्यापारी आपले सामान घेऊन स्टेशन रोड रस्त्यावर बसून मालाची विक्री करतात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असतो.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सासष्टी: समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी मडगाव नगरपालिका उद्यानातील भिकाऱ्यांना ताब्यात घेण्याची घटना ताजी असताना पिंपळकट्ट्यावर सुद्धा भिकाऱ्यांची संख्या वाढल्याची तक्रार मडगाव न्यू मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाळ नाईक यांनी केली. त्याप्रमाणे पोलिसांनी येऊन येथील परिस्थितीची पाहणी केली व भिकाऱ्यांना तिथून हाकलून लावले.

या संदर्भात बोलताना गोपाळ नाईक म्हणाले, पिंपळकट्टा परिसरात दररोज सहा सात भिकारी बसताता. त्यांच्या बरोबर असलेली महिला आपली भांडी तिथे ठेवते. तिथेच ते जेवण करतात, दारू पितात व परिसर अस्वच्छ करून टाकतात. आम्ही कितीही हटकले तरी ते तिथून जात नाहीत. त्यामुळे आम्हाला पोलिस तक्रार करावी लागली.

गांधी मार्केट मधील व्यापारी आपले सामान घेऊन स्टेशन रोड रस्त्यावर बसून मालाची विक्री करतात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असतो. त्या परिसरात ते दुचाकी सुद्धा पार्क करू देत नाहीत व दादागिरी करतात अशी तक्रार आल्याचे नाईक यांनी सांगितले. पोलिसांनी हा रस्त्यावर विक्री करणाऱ्यांवर कित्येकदा कारवाई केली आहे. पण काही दिवसानंतर ते परत तिथे विक्री करतात. यावर कायम स्वरुपी उपाय योजनेची आवश्यकता आहे, असे नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT