Yogesh Shetkar Dainik Gomantak
गोवा

Margao Crime: हडपलेले 17 लाख योगेश शेटकरकडून वसूल करणार; मडगावच्या नगराध्यक्षांनी ठणकावलं

Margao Fraud Case: गत फेस्त फेरीतील गोळा केलेले सुमारे १७ लाख रुपये हडप केलेले मडगाव नगरपालिकेतील निलंबित कारकून योगेश शेटकर याला पोलिसांनी अटक केली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: गत फेस्त फेरीतील गोळा केलेले सुमारे १७ लाख रुपये हडप केलेले मडगाव नगरपालिकेतील निलंबित कारकून योगेश शेटकर याला पोलिसांनी अटक केली आहे व चौकशी चालू आहे. त्यामुळे आपण यासंदर्भात जास्त काही बोलू शकत नाही. तरीही त्याच्याकडून पूर्ण रक्कम वसूल केली जाईल, असे मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

सध्या त्याच्या प्रॉविडंट फंडात (Provident Fund) किती रक्कम आहे तसेच त्याची रजा किती बाकी आहे याबद्दल माहिती मिळविण्यात येत आहे. त्याच्याकडून ११ लाख रुपये वसूल करणे शक्य आहे. त्याच्याकडून यापूर्वीच तीन लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत, अशी माहिती नगराध्यक्षांनी दिली.

गत फेस्त फेरी आपल्याला डावलून करण्यात आली होती. मात्र, यावेळी विद्यमान मुख्याधिकारी मेल्विन वाझ यांनी आपल्याला विश्र्वासात घेत फेस्त फेरीतून गोळा केलेली रक्कम व्यवस्थितपणे नगरपालिकेच्या खात्यात जमा करण्यात आली. यावेळी जवळ जवळ ३२ लाख पेक्षा जास्त महसूल नगरपालिकेला मिळाल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली. नगरपालिका इमारतीच्या नुतनीकरणासंदर्भातील प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, पण सध्या ११ लाख रुपये खर्चून नगरपालिका इमारतीची रंगरंगोटी केली जात आहे, असे नगराध्यक्षानी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nora Fatehi Accident: नोरा फतेहीच्या कारला जोरदार धडक; अभिनेत्रीच्या डोक्याला दुखापत, मद्यधुंद चालकाचा हैदोस!

IRCTC Tour Package: नव्या वर्षाचं सेलिब्रेशन गोव्यात! 'आयआरसीटीसी'ने आणलंय स्वस्त आणि मस्त टूर पॅकेज; लगेच करा बुकिंग

Super Sunday! आशिया कपसाठी भारत-पाकिस्तानमध्ये 'कांटे की टक्कर', कधी अन् कुठे पाहता येणार अंतिम सामना? जाणून घ्या

Eggs Cancer Rumour: अंडी खाणं 100% सुरक्षित, कॅन्सरच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; 'FSSAI'चं स्पष्टीकरण

गोवा, कोकण भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाया घालणाऱ्या दुर्गानंद नाडकर्णी यांचे निधन; मुख्यमंत्र्यांनी अर्पण केली श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT