Margao Crime: मडगाव पालिकेला लाखोंचा गंडा, योगेशसह चार अधिकाऱ्यांचा हात; पोलिसांचे मात्र प्रकरणावर मौन
Yogesh ShetkarDainik Gomantak

Margao Crime: एकटा योगेश नव्हे 17.50 लाखांच्या घोटाळ्यात महिला कर्मचाऱ्यासह चार अधिकाऱ्यांचाही हात; पोलिसांचे मौन

Margao Muncipal Council: फेस्‍त फेरीचे पैसे बेकायदेशीररित्‍या वसूल करून ते स्‍वत:च्‍या बँक खात्‍यात वळवून मडगाव पालिकेला कारकून याेगेश शेटकर याने 17.50 लाखांना गंडा घातला होता.
Published on

मडगाव: मडगाव पालिकेच्‍या लेखा विभागाशी कुठलाही संबंध नसताना फेस्‍त फेरीचे पैसे बेकायदेशीररित्‍या वसूल करून ते स्‍वत:च्‍या बँक खात्‍यात वळवून मडगाव पालिकेला कारकून याेगेश शेटकर याने १७.५० लाखांना गंडा घातला होता.

हा गफला करण्‍यात पालिकेतील आणखी चार अधिकाऱ्यांचा हात असल्‍याची कबुली शेटकर याने पाेलिसांसमोर दिल्‍याची खात्रीशीर माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात मडगाव पोलिसांशी संपर्क साधला असता, या प्रकरणी तपास सुरू आहे.

त्‍यामुळे आम्‍ही कुठलीही माहिती उघड करू शकत नाही, असे सांगण्‍यात आले. असे जरी असले तरी सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, या गफल्‍यात एका मोठ्या हुद्यावरील अधिकाऱ्याचा हात असून एका महिला कर्मचाऱ्याचाही या वाटणीत भाग असल्‍याचे समजते.

दरम्‍यान, योगेश शेटकर याच्‍या सात दिवसांच्‍या पोलिस कोठडीचा रिमांड संपत असल्‍याने गुरुवारी सकाळी त्‍याला पुन्‍हा मडगाव न्‍यायालयात (Court) हजर करण्‍यात येणार असल्‍याची माहिती मडगावचे पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली.

Margao Crime: मडगाव पालिकेला लाखोंचा गंडा, योगेशसह चार अधिकाऱ्यांचा हात; पोलिसांचे मात्र प्रकरणावर मौन
Margao Municipality: पाणी, वीजजोडणी आदेशांच्या नोंदीचा अभाव; पालिका अधिकाऱ्यांचा गलथान कारभार चव्हाट्यावर!

रक्कम वसूल करा!

सावियो कुतिन्हो म्हणाले की, या अधिकाऱ्यांचा या घोटाळ्यात काही संबंध आहे का याचीही चौकशी व्‍हायला हवी. मडगावातील (Margao) करदात्‍यांच्‍या पैशांवर हा डल्‍ला मारला असल्‍याने ही रक्‍कम कोणत्‍याही प्रकारे वसूल करण्‍याची गरज आहे. जर शेटकरकडून ती वसूल होत नसेल तर त्‍याच्‍यावर ही वसुलीची जबाबदारी सोपविली, त्‍या अधिकाऱ्याकडून ती रक्‍कम वसूल करण्‍याची गरज आहे.

Margao Crime: मडगाव पालिकेला लाखोंचा गंडा, योगेशसह चार अधिकाऱ्यांचा हात; पोलिसांचे मात्र प्रकरणावर मौन
Margao Municipality : बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

पार्ट्यांवर उडविले संशयितांनी पैसे

सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, सोपाे करातून एकत्र केलेली ही रक्‍कम चार सहकाऱ्यांमध्‍ये वाटली. त्‍यात एका महिला कर्मचाऱ्याचाही समावेश होता. यातील काही रक्‍कम या सहकाऱ्यांना पार्टी देण्‍यासाठी वापरली, अशी कबुली योगेशने पोलिसांना दिली आहे. एसजीपीडीए मार्केटमधील ओशिया कॉम्‍प्‍लेक्‍समध्‍ये एक हॉटेल असून त्‍या हॉटेलमध्‍ये या पार्ट्या व्‍हायच्‍या. दर दिवशीच्‍या पार्टीचे बिल सात ते १० हजार रुपये व्‍हायचे, अशीही माहिती उपलब्‍ध झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com