Margao Kadamba Bus Stand Road Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus Stand: कदंब स्थानकातील रस्ता खराब! नागरिक, वाहनचालकांना होतो त्रास; दक्षिण गोवा रस्ता सुरक्षा बैठकीत चर्चा

Margao Kadamba Bus Stand Road: कदंब बस स्थानक ते फातोर्डाला जाणारा हा आतील रस्ता असला तरी तिथून अनेक वाहने दररोज ये जा करतात. नागरिकही या वाटेने चालत जातात.

Sameer Panditrao

सासष्टी: दक्षिण गोवा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक शुक्रवारी जिल्हा प्रशासन इमारतीच्या सभागृहात झाली. ही बैठक दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश गावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत अनेक विषयांबरोबर मडगाव कदंब बस स्थानकातील खराब झालेल्या रस्त्याचा विषयही चर्चेला आला.

कदंब बस स्थानक ते फातोर्डाला जाणारा हा आतील रस्ता असला तरी तिथून अनेक वाहने दररोज ये जा करतात. नागरिकही या वाटेने चालत जातात. मात्र गेल्या कित्येक दिवसापासून या रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडलेले आहे.

या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सोपविण्यात आल्याचे गोवा कॅनच्या प्रतिनिधी लॉर्ना फर्नांडिस यांनी पत्रकारांना सांगितले.

या बैठकीत दक्षिण गोव्यातील रस्ता सुरक्षा संदर्भातील अनेक प्रश्‍न चर्चेला आले व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना तसेच नगरपालिका, पंचायत या स्थानिक संस्थांनाही त्याची दखल घेण्यास सांगितल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश गावकर यांनी पत्रकारांना सांगितले.

भटकी गुरे जबाबदारी पशुसंवर्धन खात्याची...

गोवा कॅनच्या लॉर्ना फर्नांडिस यांनी सांगितले की, कोलवा सर्कल ते कोलवा, गुडी पाड्डे ते केपे, ओर्ली ते चिंचोणे या रस्त्यांचे रुंदीकरण पूर्ण झाले तरी वीज खांबे मध्ये होते, हा विषय चर्चेला आला तेव्हा खांबे हटविल्याची माहिती देण्यात आली.

भटक्या गुरांचा प्रश्नही बैठकीत उपस्थित झाला. नगरपालिकेकडे सामंजस्य करार झाल्याचे सांगण्यात आले, तरीही पशू संवर्धन खात्याची जबाबदारी संपत नाही. अजूनही गुरे रस्त्यावर भटकताना दिसतात. आम्ही सामंजस्य कराराची प्रत मागितल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.

या बैठकीत रस्त्याच्या बाजूची झाडी कापणे, मुलांच्या सुरक्षा समित्या शाळेबरोबर जिल्हा स्तरावर नेमाव्या, हीट ॲण्ड रन अपघात संदर्भात समित्या, सर्व अपघातांची पोलिस चौकीत नोंद, रस्त्याच्या बाजूला बसणारे विक्रेते या संदर्भात चर्चा करण्यात आल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Missing Police Constable: ..घरच्यांनी सांगितले केरळला गेला! पोलिस कॉन्स्टेबल 2 वर्षे बेपत्ता; मायणा कुडतरीतील शिपायाला बडतर्फीची नोटीस

Goa Cancer Hospital: 'कॅन्‍सर इस्‍पितळ' वर्षभरात कार्यान्‍वित होणार! मंत्री राणेंनी दिली हमी; सामंजस्‍य कराराची प्रक्रियाही सुरू

Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

Goa Politics: खरी कुजबुज; हे नगरसेवक आहेत कुठे?

BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

SCROLL FOR NEXT