Kadamba Smart Pass: रांगेत उभं राहण्याची झंझट संपली, कदंब प्रवाशांसाठी स्मार्ट ट्रान्झिट पास व कार्डची सोय; पासधारकांना 50% सवलत

Kadamba Transport card: कदंब बस वाहतूक महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता प्रवाशांना स्मार्ट ट्रान्झिट पास आणि स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे.
Kadamba Smart Pass
Kadamba Smart PassDainik Gomantak
Published on
Updated on

Smart Transit Pass: कदंब बस वाहतूक महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता प्रवाशांना स्मार्ट ट्रान्झिट पास आणि स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. यासंदर्भात माहिती देताना महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी सांगितले की, ही नवी सेवा १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू करण्यात येणार आहे.

तुयेकर यांनी स्पष्ट केले की, पूर्वी महामंडळातर्फे पेपर पास देण्यात येत होते. त्याजागी आता डिजिटल स्वरूपातील स्मार्ट पास आणि कार्ड देण्यात येणार असून, हे तंत्रज्ञान प्रवाशांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरेल. स्मार्ट ट्रान्झिट पास नियमित एकाच मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी आहे. विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि नियमित प्रवासी यांना याचा अधिक लाभ होणार असून, स्मार्ट ट्रान्झिट पासधारकांना ५० टक्के सवलत दिली जाईल.

Kadamba Smart Pass
Mumbai Goa Highway: कोसळणारा धबधबा, पुरातन मंदिर; मुंबई गोवा महामार्गाजवळ आहे 'हे' स्वप्नवत ठिकाण

स्मार्ट कार्ड बाबत अधिक माहिती देताना तुयेकर म्हणाले, “हे कार्ड कुठल्याही मार्गावर वापरता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकिटासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. शिवाय, हे कार्ड कार्डधारकाच्या कुटुंबीयांनाही वापरता येईल, हे या सुविधेचे खास वैशिष्ट्य आहे.”

सध्या इतर अनेक राज्यांमध्ये ही सेवा यशस्वीरित्या सुरू असून, गोव्यातही ही सुविधा सुरू करण्यासाठी कदंब महामंडळ प्रयत्नशील आहे. यामुळे प्रवास कॅशलेस होईल व डिजिटल व्यवहारांना चालना मिळेल, असेही तुयेकर यांनी सांगितले.

Kadamba Smart Pass
Vitthal Temple Goa: विठ्ठलापुरात भरला भक्तांचा मेळा! पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी; CM सावंतांकडून श्रींच्या मूर्तीवर अभिषेक

स्मार्ट कार्डधारकांना १० टक्के सवलत मिळणार असून, आतापर्यंत २५,९६० प्रवाशांनी हे कार्ड घेतले असल्याची माहितीही त्यांनी दिली. ही सुविधा सुरू होण्याआधी म्हणजे ३१ जुलै २०२५ पर्यंत प्रवाशांना विनामूल्य कार्ड मिळू शकते. मात्र, कार्ड हरवले, तर नवीन कार्डसाठी २३५ रुपये शुल्क आकारले जाईल, असेही तुयेकर यांनी स्पष्ट केले. तुयेकर यांनी सर्व गोमंतकीय प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com