Kadamba Bus: विद्यार्थ्यांना मुद्दाम सांगितले ‘बस’ला धक्‍का द्या! ‘कदंब’कडून चालक निलंबित; Video मुळे कारवाई

Kadamba Bus Student Driver Issue: नुवे-मनोरा येथे रस्‍त्‍यावर बंद पडलेल्‍या कदंब बसला विद्यार्थी धक्‍का देतात, हा व्हिडिओ व्‍हायरल झाल्‍यानंतर कदंब महामंडळाने या घटनेची तातडीने चाैकशी सुरू केली आहे.
Goa Kadamba Bus Student Issue
Goa Kadamba Bus NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: नुवे-मनोरा येथे रस्‍त्‍यावर बंद पडलेल्‍या कदंब बसला विद्यार्थी धक्‍का देतात, हा व्हिडिओ व्‍हायरल झाल्‍यानंतर कदंब महामंडळाने या घटनेची तातडीने चाैकशी सुरू केली आहे. बस सुस्‍थितीत असतानाही बसचालक राजेश पागी याने बस बंद पाडून मुद्दामहून विद्यार्थ्यांना धक्‍का देण्‍यास भाग पाडल्‍याचे प्राथमिक चाैकशीत दिसून आल्‍यावर या बसचालकाला मेमो देण्‍याबरोबरच एक महिन्‍यासाठी सेवेतून निलंबित करण्‍यात आले आहे, अशी माहिती कदंब महामंडळाचे अध्‍यक्ष आमदार उल्‍हास तुयेकर यांनी दिली.

काल हा व्हिडिओ प्रसारित झाला होता. दुपारी २.१० वाजण्‍याच्‍या सुमारास विद्यार्थी ‘बस’ला धक्‍का देत असल्‍याचे त्‍यात दिसून येत असून हा व्हिडिओ समाजमाध्‍यमावर प्रसारित झाल्‍यानंतर पालकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्‍यक्‍त करण्‍यात आल्‍या होत्‍या.

Goa Kadamba Bus Student Issue
Kadamba Smart Pass: रांगेत उभं राहण्याची झंझट संपली, कदंब प्रवाशांसाठी स्मार्ट ट्रान्झिट पास व कार्डची सोय; पासधारकांना 50% सवलत

यासंदर्भात महामंडळाचे अध्‍यक्ष तुयेकर यांना विचारले असता, ‘बस’ला धक्‍का देण्‍यास सांगण्याचा हा प्रकार एकप्रकारे विद्यार्थ्यांच्‍या जीवाशी खेळण्‍यासारखा होता. असे प्रकार भविष्‍यात आणखी होऊ नयेत यासाठी योग्‍य ती उपाययोजना केली जाईल.

Goa Kadamba Bus Student Issue
Kadamba Bus Stand: होंडा कदंब बसस्थानकाचा 'निकृष्ट' कारभार! कोट्यवधी खर्चूनही दुरवस्था, छप्पर गळके अन् लाद्याही फुटल्या; प्रवाशांचे हाल

आम्‍ही केलेल्‍या प्राथमिक चौकशीत त्‍या ‘बस’मध्‍ये कुठलाही तांत्रिक दोष नव्‍हता. आपल्‍याला नुवे-मनोरा मार्गावर बस चालविण्‍याची ड्युटी दिली आहे. या कारणाने बसचालक पागी नाराज होता. त्‍यामुळे त्‍याने मुद्दामहून बस बंद पाडली आणि विद्यार्थ्यांना ‘बस’ला धक्‍का देण्‍यास भाग पाडले, असे चाैकशीत पुढे आले आहे. त्‍यामुळे या बसचालकावर शिस्‍तभंगाची कारवाई करण्‍याचा निर्णय आम्‍ही घेतला आहे.

- उल्‍हास तुयेकर, अध्‍यक्ष, कदंब महामंडळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com