Margao fire brigade Rescue Dogs Dainik Gomantak
गोवा

अग्नीशमन दलाकडून माणुसकीचे दर्शन, पावसाच्या पाण्यात अडकलेल्या दोन श्वानांसह पाच पिल्लांना जीवदान

दोन कुत्र्यांना आणि पाच लहान पिल्ले पाण्यात अडकली होती

गोमन्तक डिजिटल टीम

Margao fire brigade : मडगाव येथे दोन श्वानांना आणि पाच लहान पिल्लांना जीवदान देण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. ही घटना एसजीपीडीएच्या घाऊक मासळी मार्केट परिसरात घडली. जवानांनी पाण्यावर शिडीच्या सहाय्याने वाट काढत त्यांना बाहेर काढले. या कामाबद्दल अग्नीशमन दलाच्या जवानांचे मडगाववासीयांकडून कौतुक करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मडगाव येथील मासळी मार्केट परिसरात एका पडक्या घरात एका श्वानाने लहान पिल्लांना जन्म दिला होता. घराच्या दुसऱ्या बाजूला जवळच पुल बांधण्याचे काम चालू असल्याने खड्डा खणला आहे. सतत पडत असलेल्या पावसाने या जागेत पाणी भरल्याने श्वानांसह तिची पिल्ले तिथे अडकली होती.

याबाबतची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत शिडी त्या पाण्यावर आडवी टाकून वाट तयार केली व श्वानांसह पिल्लांना एका टोपलीत घालून पाण्याच्या बाहेर काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT