FC Goa : सीमोल्लंघनासाठी हीच योग्य वेळ : रेट्रे

एफसी गोवाचा नवा परदेशी : दोन वेळचा ए-लीग विजेता ऑस्ट्रेलियन मध्यरक्षक
Paulo Retre
Paulo RetreDainik Gomantak
Published on
Updated on

Australian football player Paulo Retre : मायदेशी ऑस्ट्रेलियात उच्च दर्जाचे फुटबॉल खेळत आश्चर्यकारक वर्षे व्यतित केली व करंडक जिंकले. आता सीमोल्लंघनासाठी योग्य वेळ असल्याचे जाणवले आणि भारतात खेळण्याचे आव्हान सर्वोत्तम असल्याचे मनोमन वाटले. त्यामुळेच एफसी गोवाचा करार स्वीकारला, असे पावलो रेट्रे याने इंडियन सुपर लीग (आयएसएल) संघाशी करार केल्यानंतर सांगितले.

एफसी गोवाने आगामी मोसमापूर्वी करारबद्ध केलेला ऑस्ट्रेलियन मध्यरक्षक पहिला परदेशी ठरला. या सेंट्रल मध्यरक्षकासाठी गोव्यातील संघाने चांगली रक्कम मोजली असून आकडा जाहीर केलेला नाही. रेट्रे पूर्वी सिडनी एफसी संघात होता आणि या संघातून खेळताना 2019 व 2020 मध्ये ए-लीग विजेता ठरला.

भारतीय आंतरराष्ट्रीय संदेश झिंगन, रॉलिन बोर्जिस, रेनियर फर्नांडिस, उदांता सिंग, तसेच नवोदित बोरिस सिंग यांच्यानंतर नव्या मोसमासाठी एफसी गोवाने करारबद्ध केलेला रेट्रे हा सहावा फुटबॉलपटू ठरला.

Paulo Retre
ठरलं! गोव्यातून राज्यसभेसाठी सदानंद शेट तानावडे यांचे नाव निश्चित, कोअर कमिटीचा निर्णय

संस्कृती, लोक, क्लब सारं नावीन्यपूर्ण

एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर रेट्रे म्हणाला, ``येथील नवी संस्कृती, भरपूर नवे लोक यांच्यासह माझ्याप्रमाणे फुटबॉलप्रती उत्कटता जोसणारा क्लब आहे. एफसी गोवाचा पाया भक्कम असून ते महत्त्वाकांक्षी आहेत. देशातील या सर्वोत्तम क्लबची मूळे खोलवर रुजलेली आहेत. या संघाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.``

पावलो रेट्रे याचे संघात स्वागत करताना एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कूर यांनी सांगितले, की ``पावलो भरपूर अनुभवासह येत आहे. पायाशी चेंडू राखणे त्याला आवडते आणि खेळावरील त्याचे नियंत्रण उत्कृष्ट आहे. आमच्या शैलीतील फुटबॉलमध्ये चेंडूवर हुकमत राखणारा खेळाडू चपखलपणे बसतो. तो लगेच आमच्या संघात स्वतःचा जागा प्रस्थापित करण्याचा विश्वास आहे.``

Paulo Retre
Pernem Excise Scam : पेडणे अबकारी खात्यातील घोट्याळ्याप्रकरणी तक्रार दाखल

उपयुक्त सेंट्रल मिडफिल्डर

पावलो रेट्रे ३० वर्षांचा आहे. सिडनी एफसीतर्फे २०१७ पासून तो १७६ सामने खेळला. या संघातर्फे तो एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेतही खेळला आहे. त्यापूर्वी तो मेलबर्न सिटीतर्फे खेळत होता.

केवळ सेंट्रल मिडफिल्डर याच जागी नव्हे, तर कोणत्याही जागी खेळण्याचा त्याचा हातखंडा आहे. विशेषतः सेट पिसेस रणनीतीत तो जास्त प्रभावी ठरतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com